भारताचा दरडोई जीडीपी 30%, तर बांगलादेशपेक्षा 11 पटींनी वाढला

  • तरीही राहुल गांधींचा मोदी सरकारवर “सिलेक्टिव्ह” निशाणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : “भारताचा दरडोई जीडीपी ओलांडून बांगलादेश ही पुढे जाणार”, अशी कथित बातमी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या हवाल्याने येताच भारतीय विरोधी पक्षांना उकळ्या फुटल्या. केरळमधील वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधींनी, “ही पहा यांच्या सहा वर्षातील प्रगती”, असे ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला. परंतु आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विशिष्ट अहवालाचा विशिष्ट आकड्याचा हवाला देऊन राहुल गांधींनी शेअर केलेली बातमी ही नुसतीच एकतर्फी नसून आकडेवारीतहीगडबडीची ठरली आहे.

प्रत्यक्षात भारताचा जीडीपी दरडोई जीडीपी 30 टक्क्यांनी वाढून बांगलादेशपेक्षा ११ पटीने वाढल्याचे नाणेनिधीच्याच अहवालात नमूद करण्यात आले आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरीटीच्या निकषावर ही आकडेवारी तपासली असता वरील वास्तव सर्वांसमोर स्पष्ट होते. परंतु राहुल गांधींनी “सिलेक्टिव्ह” एकच आकडा उचलून लोकांसमोर मोदी सरकारला उघडे पाडण्याचा आव आणला परंतु प्रत्यक्षात नाणेनिधीच्याच आकडेवारीने त्यांचा हा दावा फोल ठरला.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील 2014 – 15 च्या आकडेवारीनुसार भारताचे दरडोई उत्पन्न 83,00091 रूपये होते ते वाढून 2019 – 20 मध्ये 1,08,620 रूपये झाले. ही वाढ 30.7 टक्के होते.

यूपीएच्या दुसऱ्या तर मधील जीडीपीची वाढ 19.8 टक्के नोंदवली गेली आहे. पर्चेसिंग पॉवर पँरिटीनुसार भारत बांगलादेशाच्या ११ पट पुढे आहे. भारताची लोकसंख्या भारत बांगलादेशाच्या तुलनेत 8 पट जास्त आहे. येथेही भारत बांगलादेशाच्या कितीतरी पुढे असल्याचे स्पष्ट होते. तरीही राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधण्यासाठी नाणेनिधीच्या अहवालातील विशिष्ट आकड्याचा आधार घेतलेला दिसतो.

नाणेनिधीच्या 2020 च्या आर्थिक भाकितानुसार भारताचा जीडीपी 6,284 अमेरिकी डॉलर असेल, तर बांगलादेशची बांगलादेशचा जीडीपी 5,139 डॉलर असणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*