मुख्यमंत्री भेटत नाहीत म्हणून शिवसेना नेते किशोर तिवारी भेटले राज्यपालांना


  • मुख्यमंत्र्यांसकट शिवसेना नेत्यांचे केले राजकीय वस्त्रहरण
  • संजय राऊत म्हणाले होते, महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “मातोश्रीबंद” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत म्हणून शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी चार दिवस वाट पाहून आज अखेर राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी म्हणून किशोर तिवारी गेले चार दिवस मुंबईत होते. परंतु, प्रयत्न करूनही त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. अखेर त्यांनी राजभवन गाठून राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. governer-bhagat-singh-koshiyari

राज्यात लोकनियुक्त सरकार असताना महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी भाषा शिवसेना खासदार संजय राऊ यांनी वापरली होती. पंण मुख्यमंत्री चार – चार दिवस भेटतच नसल्याने किशोर तिवारींसारख्या शिवसेना नेत्यानेच राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच संजय राऊतांचे पुरते राजकीय वस्त्रहरण केले आहे.governer-bhagat-singh-koshiyari

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणाला भेटत नाहीत. मातोश्रीतून सगळा कारभार बघतात. शिवसेना आमदार, खासदारांसाठीही ते नॉट रिचेबल असतात अशा अनेक वर्षांपासूनच्या तक्रारी आहेत. अमरावतीचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना भेट मिळाली नाही. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना ५० फोन केले. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे अमर उजालाने रवी राणांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

तोच अनुभव वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष असलेल्या किशोर तिवारींना आला. ते गेले चार दिवस मुख्यमंत्र्यांच्या अपॉइंटमेंटची वाट पाहात मुंबईत थांबले होते. त्यांना ती मिळाली नाही. म्हणून ते राज्यपालांना राजभवनात जाऊन भेटले. ही माहिती स्वतः किशोर तिवारींनीच पत्रकारांना दिली.

governer-bhagat-singh-koshiyari

राज्यातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे – पवार सरकारने १० हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु, ही मदत अतिशय तुटपूंजी आहे. शेतकऱ्यांची अतिवृष्टीने झालेले नुकसाना कितीतरी पट अधिक आहे, असे किशोर तिवारींचे म्हणणे आहे. ते त्यांना मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून कानावर घालायचे होते. परंतु, घरात बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट त्यांना मिळाली नाही. अखेर त्यांनी राजभवन गाठून राज्यपालांना शेतकऱ्यांना आणखी मदत देण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था