बाबांचा निर्णय दुखःदायक,मी पक्ष सोडणार नाही,रक्षा खडसे

विशेष प्रतिनीधी

नाशिक : अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्षात जाणार अशी चर्चा होती, आज त्यांनी भाजप सदस्यत्वाचा खडसेनी राजीनामा देत देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती आरोप केले आहे. याबाबत त्यंच्या सुनबाई खासदार रक्षा खडसेनी याबाबत आपली प्रतिक्रीया दिली. यात त्यांनी बाबांनी घेतलेला निर्णय हा व्यक्तीगत असून तो दुखद आहे. मी भाजपमध्येच असून पक्ष देईल. ती जबाबदारी पार पाडणार आहे,असे सांगितले.

एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्याच्या घेतल्यावर पुढे बोतांना त्या म्हणाल्या की बाबांचा(एकनाथ खडसे) यांचा निर्णय दुखद आहे.पण त्याचा निर्णय हा व्यक्तीगत आहे. लोकांनी मला भाजपकडून निवडून दिले आहे. त्यामुळे मी पक्षातच राहणारआहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती करेल.

चाळीस वर्षे त्यांनी पक्ष वाढवला

नाथाभाऊ पक्षावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय. चाळीस वर्षे त्यांनीपक्ष वाढवला. मात्र आज त्यांनी व्यक्तीगत कारणामुळे राजीनामा दिला,असे खडसे म्हणाल्या.
माझ्यावर कोणताच दबाव नाही

माझ्यावर बाबांनी कधीच कुठला दबाव टाकलेला नाही. जनतेची सेवा हेच आमचं मत आहे. मी कधीपर्यत पक्षात राहणार याच भाकीत कुणीच करू शकत नाही, कुणाबाबत देखील आपण असे भाकीत करू शकत नाही,आता आपण भाजपमध्येच असल्याचे रक्षा खडसे म्हणाल्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*