धारावीत कष्ट संघ स्वयंसेवकांचे; श्रेय ठाकरे-पवार सरकार घेतय


  • धारावीत सरकारने नव्हे; तर स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला : चंद्रकांत पाटील
  • ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केले पाहिजे

वृत्तसंस्था 

मुंबई :  धारावीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. त्यामुळे कोरोनामुक्त धारावीचे सगळे श्रेय हे ठाकरे – पवार सरकारने घेण्याचे काही कारण नाही, असे परखड मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. उलट कोरोना विरोधातील लढाईत सरकारने भ्रष्टाचार केला, असा आरोप पाटील यांनी सरकारवर केला.

ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केले पाहिजे. पण चुकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी ‘धारावी’ कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. याचे सगळे श्रेय सरकारचे नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे, असे पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारने १४ वित्त आयोगाचे  ग्रामपंचायतीना दिलेले ते पैसे राज्य सरकार कसे वापरू शकते? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला. हे पैसे राज्य सरकारने घेता कामा नयेत, ते परत ग्रामपंचायतींना मिळाले पाहिजे. वित्त आयोगाने मांडलेल्या प्रस्तावावर हसन मुश्रीफ यांनी सत्कार करून घेतला. यात मुश्रीफ यांचे काहीही काम नाही. त्याचे श्रेय त्यांनी घेऊ नये. केवळ कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सगळ्यावर आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या प्रमाणेच भाजप नेते नितेश राणे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. धारावीत कोरोनाचे रुग्ण कमी झाले याचं संपूर्ण श्रेय हे RSS च्या स्वयंसेवकांना असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था