एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी नाकर्त्या ठाकरे – पवार सरकारवरच; फडणवीसांचा घणाघात


विशेष प्रतिनिधी

मुंबई : तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर पगार एसटीचे दोन कर्मचारी आत्महत्या करतात. त्यांच्या आत्महत्येची जबाबदारी महाराष्ट्रातल्या नाकर्त्या ठाकरे – पवार सरकारवरच आहे, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. devendra fadnavis news

जळगाव आणि रत्नागिरीत दोन एसटी कर्मचाऱ्यांनी ठाकरे पवार सरकारवर ठपका ठेवत आणि सरकारला जबाबदार धरत आत्महत्या केल्या. त्यावर फडणवीस यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “वेतन न मिळाल्याने दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या या अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहेत. एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दोन कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

devendra fadnavis news

आता तरी ठाकरे – पवार सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार?  या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार काय?; असा परखड सवालही फडणवीस यांनी केला आहे.

JusticeForSTemployees

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था