दसरा मेळाव्यातून राष्ट्रीय चेतना जागृती ते वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचा हुंकार


  • वैचारिक रूप पालटून वैयक्तिक राजकीय संघर्षाचे रूप धारण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय चेतना जागृतीसाठी निर्माण झालेले दसरा मेळावे आता वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचा हुंकार भरण्यासाठी परिवर्तित झाले की काय, असे वाटण्याची परिस्थिती आली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन संचालन आणि मेळावा सरसंघचालकांचे धोरणात्मक भाषण यासाठी गाजतो. शिवसेनाप्रमुखांचा दसरा मेळावा  “विचारांचे सोने लुटायला वाजत गाजत शिवतीर्थावर या”, अशा घोषणा आणि जाहिरात करत संपन्न व्हायचा. नागपुरात धम्मदीक्षा परावर्तन दिन बाबासाहेबांचे अनुयायी उत्साहात आणि दिमाखात साजरे करायचे.rss dasara melava

पण कोरोनाने या सर्वांवर दुर्दैवाने पाणी फिरवले असले तरी यंदा मात्र दसरा मेळाव्यामध्ये विचारांचे सोने लूटण्याऐवजी वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचे हुंकार भरण्यापर्यंत येऊन ठेपलेत की काय हे म्हणायची वेळ आली आहे.

सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी चीन विरोधात भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्राची स्तुती जरुर केली. संघाच्या पठडीत बसणारा मेळावा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मन की बात साधताना दसरा सण खरेदी – दिवाळी सण खरेदीत “व्होकल फोर लोकल” संदेश दिला.

पण त्याच वेळी पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे यांच्या सारखे नेते या दसरा मेळाव्यांचे उपयोग आक्रमकपणे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा जाहीर करण्यासाठी वापरताना दिसत आहेत. हे दोन्ही नेते “व्हिक्टिम कार्ड” खेळून आपल्यावरचा अन्याय दूर करण्याची आक्रमक भाषा वापरताना दिसून येतात. पक्ष धोरण किंवा सरकार धोरण यावर जाताजाता केलेले सकारात्मक आणि
नकारात्मक भाष्य यापेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षांना दिलेले महत्त्व हे पंकजा मुंडे यांच्या भाषणाचे वैशिष्ट्ये ठरले.

उद्धव ठाकरे यांचे भाषण जरी अध्याप व्हायचे असले तरी संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणाची झलक सकाळ – दुपारीच मुलाखतींमधून दाखवली आहे. शिवसेनाप्रमुखांची “विचारांचे सोने लुटायला या” घोषणा कधीच इतिहास जमा झाली याचे प्रत्यंतर राऊतांनी दिले. त्यापुढे जाऊन “गेले वर्षभर साचलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर काढतील”, असे सांगून शिवसेनेचा दसरा मेळावा सोने लुटणेऐवजी भडास काढण्यासाठी असल्याचे त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था