कुशनच्या प्रश्नावर राहुल गांधी चिडले; पंतप्रधानांचे ५० पलंगी विमान “काढले”

  • पंतप्रधानांनी ५० पलंगी विमान खरेदी केले ते का नाही विचारत?; राहुल गांधींच सवाल

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्या रॅलीतील ट्रॅक्टरवर बसलेला राहुल गांधींचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या ट्रॅक्टरला लावलेल्या कुशनवरून राहुल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला राहुल गांधींनी चिडून उत्तर दिले. ५० पलंगी विमान खरेदी केले “त्यांना” का विचारत नाही?, असे राहुल यांनी सटकवले.

पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत राहुल गांधी ज्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले होते. त्याच्या सीटवर कुशन लावले होते. राहुल गांधींचा हा फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. त्यावरून भाजपा नेत्यांनीही त्यावरून खिल्ली उडवली होती.

ट्रॅक्टरवर कुशन वापरल्यासंदर्भात राहुल गांधी यांना पटियाळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले .

“हा प्रश्न कधीच विचारला जाणार नाही की, नरेंद्र मोदी यांनी ८ हजार कोटींचे दोन विमान का खरेदी केले. ८ हजार कोटी. त्यात कुशन सोडा, पूर्ण पलंग आहे. म्हणजे एक पलंग नाही, ५० पलंग असतील त्यात. हे का विचारत नाही की आमचे पंतप्रधान मोदी यांनी ८ कोटींचे विमान खरेदी केले का तर त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही तसेच विमान आहे. याबद्दल कुणी विचारत नाही. राहुल गांधी रॅलीला गेले होते, ट्रॅक्टरमध्ये बसले होते कुणीतरी कुशन लावले, हे विचारतात”, अशी टीका राहुल गांधी यांनी प्रश्नाला उत्तर देताना केली.

राहुल पुढे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघू आणि मध्यम उद्योग संपवले. त्यानंतर कोविडच्या वेळी दोन ते तीन मित्रांची मदत त्यांनी केली. करोना काळात अनेक मजूर आपल्या घरी जात होते त्यांना अन्न पाणी मिळालं नाही. लघू आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

मात्र मोदींनी हा कणा मोडून टाकला. मी फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं करोनाची साथ येऊ शकते तेव्हा मोदींनी आणि भाजपाने माझी खिल्ली उवडली होती. मार्च महिन्यात मोदींनी सांगितले की २२ दिवसात करोना विरोधी लढाई जिंकू असा दावा त्यावेळी करण्यात आला आहे. देश कसा चालवतात हे मोदींना ठाऊक नाही. लघु आणि मध्यम उद्योगांना तोडण्यासाठीच नोटबंदी, जीएसटी लावण्याचे निर्णयही घेण्यात आले,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*