सगळे घोडे तबेल्यातून उधळल्यावर काँग्रेस जागी होणार काय? राजस्थानवरून कपिल सिबल यांचा घरचा आहेर!


  • राजस्थानच्या मुद्द्यावरून कपिल सिबल यांचा संतप्त सवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : “तबेल्यातून सगळे घोडे उधळून गेल्यावर काँग्रेस जागी होणार काय?”, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी केला आहे. राजस्थानमधील पक्षातील टोकाला पोहोचलेल्या वादातून त्यांनी हे ट्विट केले आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादाने टोक गाठल्याने पक्षाच्या २४ आमदारांसह पायलट यांनी दिल्ली गाठली. काँग्रेस नेतृत्वाशी बोलण्याचा ते प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. पण इकडे गेहलोत तडजोडीच्या भूमिकेत नाहीत उलट राजस्थान सरकार पाडण्याच्या मुद्द्यावरून सचिन पायलट यांनी जबाब नोंदवलाच पाहिजे, अशी आडमुठी भूमिका त्यांनी घेतली आहे.

“मला देखील पोलिसांची नोटीस आली आहे. मी जबाब नोंदवणार आहे,” असे गेहलोत यांनी म्हटले आहे. या मुद्यावर ठिणगी पडल्यावर देखील काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने याची दखल घेणे टाळले. त्यावरूनच सिबल यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने, ‘घोडे तबेल्यातून उधळून गेल्यावर जागे होणार का?’, असे ट्विट केले आहे.

सचिन पायलट यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून सोशल मीडियात धुमाकूळ सुरू असून वेगवेगळे विनोद शेअर केले जात आहेत. “डॉ. अमित शहांचा रिपोर्ट आला आहे, राजस्थानमधले काँग्रेसच २५ आमदार बीजेपी पॉझिटिव्ह आहेत. त्यांना दिल्ली ITC हॉटेलमध्ये भर्ती करण्यात आले आहे,” असे ट्विट सध्या सगळीकडे फिरते आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था