काँग्रेसने अस्तित्व दाखवले, अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाहीत


  • शिवसेना – पवार यांच्या जुगाडात महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व हरवले
  • शिवसेना – काँग्रेस वादाची ठिणगी

विशेष प्रतिनिधी

परभणी : शिवसेना आणि शरद पवार यांच्या राजकीय जुगाडात महाराष्ट्रात काँग्रेसचे राजकीय अस्तित्वच हरवले होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी राजकीय विधान करून ते दाखवून दिले. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, असे अशोक चव्हाण यांनी केल्याने शिवसेना – काँग्रेस वादाची ठिणगी पडली आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अशोक चव्हाण यांना यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “चंद्रकांत पाटील यांनी केलेले खड्डे बुजवण्याचं काम माझ्याकडे असून तेच मी करत आहे. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाही तर कारने फिरत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

अशोक चव्हाण यांनी यावेळी पुन्हा एकदा शिवसेनसोबत महाआघाडी करण्यासंबंधी खुलासा करत दिल्लीतील नेते नाराज होते असं सांगितलं. “शिवसेनेसोबत जाण्याबद्दल दिल्लीमधील नेत्यांमध्ये नाराजी होती. दुसरीकडे राज्यात भाजपाकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेल हे मी स्वतः जाऊन दिल्लीतील नेत्यांना पटवून दिलं. यानंतरच आपण महाविकास आघाडीत सामील झालो,” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती