मुख्यमंत्र्यांचे नुसतेच हवेत बार; फडणवीसांच्या 100 पत्रांपैकी एकालाही उत्तर नाही!


  • कोरोनाचे आकडे लपवण्यापासून ओल्या दुष्काळाच्या मदतीपर्यंत महत्त्वाच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांकडून वाटाण्याच्या अक्षता

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाचे आकडे लपविण्यात पासून ते ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या मदतीने पर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिसेंबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान 100 पत्रे लिहिली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून फडणवीसांच्या एकाही पत्राला उत्तर दिले नसल्याची माहिती मिळत आहे.devendra fadnavis

मुख्यमंत्र्यांनी काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राणा भीमदेवी थाटात भाषण ठोकले खरे. परंतु महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या एकाही महत्त्वाच्या प्रश्नावर ठोस शब्दांत उत्तरे दिली नाहीत. त्यावर गुळमुळीत भाष्य करण्यात उद्धव ठाकरे यांनी धन्यता मानली.

फडणवीस यांनी ठाकरे यांना 100 पत्र लिहिली आहेत. पण त्यापैकी एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आले नाही. अशी माहिती खुद्द फडणवीस यांनीच यापूर्वी दिलेली होती. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही फडणवीसांच्या एकाही पत्राची दखल घेतली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र लिहिली. त्यापैकी एकाही पत्राचं उत्तर मला मिळालेलं नाही. पण त्या पत्रातील काही बाबींवर सरकारने विचार केला, त्यातच आपल्याला समाधान आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती.

devendra fadnavis

कोरोना चाचण्या वाढवण्यासंदर्भातही पत्रप्रपंच!

राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सप्टेंबरमध्येही एक पत्र लिहिले होतं. त्यात राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आधी कोरोना चाचण्या वाढवण्याचा सल्ला आणि मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. कोरोनाची चाचणी दिवसेंदिवस भीषण होत आहे. मुंबई जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के इतकी आहे. त्यामुळं मुंबईत तातडीनं चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

  •  मुंबईत दोन टक्क्यांनी रुग्ण वाढले, चाचण्यांची संख्या वाढवा; फडणवीसांचे बिहारमधून मुख्यमंत्र्यांना पत्रं
  •  नुकसानीचे पंचनामे होत आहेत का?, फडणवीस यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र
  •  दारु दुकानं उघडली, जिम बंद, हे दुर्दैवी, जिम तत्काळ सुरू करा, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

या महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना उत्तरे दिली नाहीत

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था