मतदानाचे नवे रेकॉर्ड सेट करा; मोदींचे बिहारमधील मतदारांना आवाहन


  • बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येईल; मोदींना विश्वास

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बिहारमध्ये अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. (bihar election news) शनिवारी १६ जिल्ह्यांमधील ७८ जागांसाठी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करत एक नवा रेकॉर्ड करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संकटात बिहार विधानसभा निवडणूक पार पडत असून पहिलीच निवडणूक ठरली आहे.bihar election news

मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “बिहार तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान करत आहे. सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाही उत्सवात सहभागी होऊन एक नवा रेकॉर्ड करावा. आणि हो मास्क वापरा तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जवळपास १२ प्रचारसभांना संबोधित केले. लोकांनी आपल्या मनात एनडीएला सत्तेत आणण्याचे पक्क केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर नितीश कुमार सलग चौथ्यांदा आपल्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचे आवाहन करत असून ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं सांगत आहेत. अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार एकत्र उपस्थित होते.

bihar election news

नितीश कुमार यांना आव्हान देणारे तेजस्वी यादव यांनी १५ हून अधिक प्रचारसभांना संबोधित केले असून त्यांच्या सभेसाठी होणारी गर्दी नितीश कुमार आणि भाजपासाठी चिंतेची बाब आहे. तिसऱ्या टप्प्यात जवळपास दोन कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. करोना संकटामुळे नक्षलग्रस्त ठिकाणे वगळता इतर ठिकाणी मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था