अर्थव्यवस्था फास्ट रिकव्हरी ट्रँकवर, उत्पादन क्षेत्रात दशकातील सर्वाधिक वाढ, वाहन उद्योग क्षेत्रात बंपर विक्री


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे डुबकी खाल्लेली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरून फास्ट रिकव्हरी ट्रँकवर येतानाचे संकेत मिळत आहेत. औद्योगिक उत्पादन क्षेत्र, वाहन उद्योग, सेवा क्षेत्र यातील वाढीची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेचा उत्साह वाढविणारी तर आहेच परंतु, सर्वसामान्य भारतीयांसाठीही मोठा दिलासा देणारी ठरते आहे.

(automobile manufacturing indian)

कोरोना लॉकाडाऊनच्या सुमारे चार महिन्यांनंतर सणासुदीच्या दिवसात वाहन उद्योगातून वाहन विक्रीची चांगली बातमी आली आहे. मोटार आणि दुचाकी उत्पादनाबरोबरच विक्रीतही बंपर वाढ झालेली आढळली. औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीने दशकातील उंचीही ओलांडली. automobile manufacturing indian

जीएसटी कलेक्शनने १ लाख कोटींचा आकडा ओलांडल्याची बातमी येतानाच अर्थव्यवस्थेतील सकारात्मक हालचालींचा अंदाज भारतीय बाजारपेठेला आला होता. परदेशातूनही भारतीय उत्पादनांच्या वाढत्या मागणीची नोंद या आकडेवारी ठळकपणे घेण्यात आलेली आहे. automobile manufacturing indian

वाहन उद्योगात मारूती, ह्युंदाई, हिरो, बजाज या कंपन्यांच्या वाहनांची विक्री वाढली. तर डिझेल विक्रीने देखील कोरोनापूर्व आकडेवारी गाठली आहे. अर्थव्यवस्थेतील या हालचाली दसरा – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी घेऊन आल्या आहेत. निक्केइ मँन्यूफँक्चरिंग पर्चेसिंग इंडेक्सनुसार मागणी – पुरवठा प्रमाण ५८.९ अंशांवर पोहोचला आहे.

automobile manufacturing indian

सप्टेंबरमध्ये हेच प्रमाण ५६.८ एवढे होते. या इंडेक्सच्या निकषानुसार ५० अंशावरची वाढ औद्योगिक क्षेत्राचा विस्तार दर्शवते. त्या खालची आकडेवारी सुधारणेस वाव असल्याचे दर्शवते. एप्रिल २०२० मध्ये मागणी – पुरवठा प्रमाण आकडेवारी २५ अशांपर्यंत खाली गेली होती. त्याचवेळी देशभर कडक लॉकडाऊन होता. औद्योगिक उत्पादन जवळजवळ ठप्प झाले होते.

जुन – जुलैतही ही आकडेवारी ५० अंशांच्या खाली तसेच आसपास होती. ऑगस्टनंतर या आकडेवारीत सुधारणा होऊन सध्या ती ५८.९ अंशांवर पोहोचली आहे. दिवाळी अद्याप १० दिवस दूर आहे. त्यावेळी हा आकडा आणखी सुधारलेला दिसण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था