अन्वय नाईक प्रकरणाचा न्यायालयाची परवानगी न घेताच फेरतपास; आत्महत्येशी अर्णवचा थेट संबंध जोडण्यात पोलिसांना अपयश


  • न्यायदंडाधिकारी यांचे ताशेरे; अर्णबला पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेता अन्वय नाईक खटल्याचा पुनर्तपास सुरू केला गेला. आरोपींचा आत्महत्येशी दुवा सिद्ध होईल, असा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. सबब, पोलीस कोठडी देता येणार नाही. म्हणून अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला. arnab goswami latest news

रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी बुधवारी अटक केली. तिघांनाही पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा फेरतपास करताना न्यायालयाची परवानगी न घेणे आणि आत्महत्या प्रकरणात तिघांचा थेट संबध प्रस्थापित करण्यात अपयश, या कारणांमुळे मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. arnab goswami latest news

अर्णब यांना बुधवारी अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. फेरवैद्यकीय तपासणीनंतर हा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला. यानंतर अर्णब व इतर दोन आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तीवाद सुरु झाला. संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत हा युक्तीवाद सुरु होता. एखाद्या प्रकरणासाठी रात्री उशिरापर्यंत अलिबाग येथील न्यायालय सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ होती.

अर्णब गोस्वामींच्या वतीने वकील गौरव पारकर, फिरोज शेख यांच्यावतीने वकील निहा राऊत तर नितेश सारडा यांच्यावतीने वकील सुशील पाटील यांनी बाजू मांडली. तर सरकारी अभियोक्ता म्हणून वकील रुपेश महाकाळ यांनी काम पाहिले. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी न्यायालयात तपासात काही निष्पन्न झाले नाही, असा अहवाल दिला आहे. तो न्यायालयाने ग्राह्य धरला. हा अहवाल मागे घेऊन फेरतपास करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला असला तरी न्यायालयाने त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे ही अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा यावेळी आरोपींच्या वतीने उपस्थित करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरला.

arnab goswami latest news

या प्रकरणाच्या फेरतपासात काही नवीन मुद्दे समोर आले आहेत. त्यांचा तपास करायचा आहे. मागील तपासात काही त्रुटी राहून गेल्या आहेत. साक्षीदारांना तपासण्यासाठी आरोपींची गरज आहे. या प्रकरणातील कागदपत्रं ताब्यात घेऊन तपासायची आहेत त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे अशी मागणी सरकारी वकिलांच्या वतीने करण्यात आली. मात्र आरोपींच्या वकीलांनी हा युक्तीवाद खोडून काढला.

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी तीनही आरोपींची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ‘आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे. पोलीस कोठडीसाठी योग्य संयुक्तिक आणि सबळ कारण देता आली नाही. अ समरी रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा फेरतपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू यां घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्थापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही,’ असं निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले. तिनही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती