अन्सारींचा वाद संपला; ओवैसींना कंठ फुटला

  • ‘वाद संपला ही चांगली गोष्ट’ बाबरी विध्वंस प्रकरणाच्या निकालानंतर पक्षकार इक्बाल अन्सारींची भावना
  • जादूने मशीद पाडली काय? : ओवैसी

वृत्तसंस्था 

अयोध्या : बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकालाचे पक्षकार इक्बाल अंसारी यांनी स्वागत केले आहे, तर असदुद्दीन ओवैसीं यांना “कंठ” फुटला आहे. त्यांनी निकालावर आगपाखड केली आहे.

आम्ही भारतीय मुस्लिम आहोत. कोर्ट साक्षीदाराच्या आधारे निर्णय देते. सीबीआय साक्षीदार देण्यास कमी पडले. त्यामुळे निर्णय कोर्टानै दिला आहे. आता वाद संपला आहे ही चांगली गोष्ट आहे. आता भारतात असा कुठला वाद होऊ नये. देशात माणूस म्हणून माणसांकडे पाहावे. संविधानाच्या मार्गाने चालावे. देव आणि अल्लाहच्या सांगितलेल्या रस्त्यावरून लोकांनी चालावं. हिंदू मुस्लिम वाद निर्माण होऊ नये, असे इक्बाल अन्सारींनी म्हटले आहे.

बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असे देखील कोर्टाने म्हटले आहे.

या निकालानंतर विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी सेलिब्रेशन सुरु केलं आहे. मुंबई भाजप कार्यालयात देखील जल्लोष केला आहे. तसंच निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

बाबरी मशीद विध्वंस झाली त्या दिवशी काय जादू झाली होती का?, मग मशीद कुणी पाडली?; ओवैसींनी हे संतप्त प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाच्या निकालानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर मशीद ३२ जणांनी पाडली नाही, तर कुणी पाडली?, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

ओवैसी म्हणाले, “सीबीआय न्यायालयाने दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूने पाडण्यात आली होती का? २८ व २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूने कुलूप उघडण्यात आले होते का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटले होते, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे.

जर तुम्ही हिंसा कराल, तर तुम्हाला मुक्तत मिळून जाईल, असे यातून दिसते. अडवाणींची रथयात्रा भारतात जिथे कुठे गेली, तिथे हिंसा झाली. लोकांच्या हत्या झाल्या. संपत्ती जाळण्यात आली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आज न्यायालयाचा निकाल येतो की ती घटना स्वयंस्फूर्त नव्हती. मग आम्ही विचारतो की, मग स्वयंस्फूर्त असण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना ओवेसी म्हणाले, “एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो, असे उमा भारती म्हणाल्या होत्या, ही गोष्ट खरी नाही का की? बाबरी मशीद पाडली जात असताना मिठाई वाटली जात होती, हे जगाने पाहिले नाही का? आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे सगळे लोक मिठाई खात होते. आनंद व्यक्त करत होते. तुम्ही संदेश काय देऊ इच्छिता. संदेश हाच जातोय की, सामूहिक हिंसा. १९५० पासून या प्रकरणात मुस्लिमांना न्याय मिळालेला नाही. ही मशीद पाडली गेली नसती, तर ९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असता का? सगळ्या जगाने पाहिले हे लोक व्यासपीठावर उभे राहून भाषणे करत होते.

लोकांना चिथावणी देत होते. सीबीआयच्या आरोपपत्रात एका साक्षीदाराने असे म्हटलेय की, त्या वेळचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी असे म्हटले होते की, बांधकाम करण्यावर बंदी आहे, पाडण्यावर नाही. हे खरे नाही का? ते पण आपण स्वीकारणार नाहीत. सीबीआयच्या आरोपपत्रात हे म्हटले आहे की, ५ डिसेंबरच्या रात्री आडवणींनी विनय कटियार यांच्या घरात कट रचला. हे खरे नाही का? आडवाणी हे कल्याणसिंहांना म्हणाले होते, मशीद पडेपर्यंत राजीनामा देऊ नका. या घटनेत न्याय झालेला नाही.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*