अजितदादा उदार झाले आणि काढून दिला भोपळा, साडेपाच महिन्यांचा थकित आणि आश्वासन महिन्याच्या पगाराचे

एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. त्यासाठी आता जागे झालेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या विनवणीनंतर अजितदादा उदार झाले आणि साडेपाच महिन्यांचा पगार थकित असूनही केवळ एका महिन्याचाच पगार देण्याचे आश्वासन दिले.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. त्यासाठी आता जागे झालेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या विनवणीनंतरही अजितदादा उदार झाले आणि साडेपाच महिन्यांचा पगार थकित असूनही केवळ महिन्याचाच पगार देण्याचे आश्वासन दिले.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा पगार रखडलेला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

गेल्या पाच-साडेपाच महिन्यांपासून कोरोना काळात एसटी बस सेवा या बंद होत्या. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या. या काळात एसटी महामंडळाला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला. एसटी सुरूवातीलाच तोट्यात होती. यामध्ये लॉकडाउनमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था महामंडळाची झाली. त्यामुळे एसटी जास्तच तोट्यात गेली. याच कारणाने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते.

या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली आहे.

ajit

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.’ असे ट्विट परब यांनी केले आहे. मात्र, उर्वरित पगार कधी देणार याबाबत मात्र परब यांनी चकार शब्द काढलेला नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*