१९६२ चे रडगाणे आणि सध्याच्या सरकार – सैन्य दलांवर प्रश्न उपस्थित करणे हे चीनधार्जिणे ठरतेय… समजत कसे नाही?


  •  माजी हवाई प्रमुख एस. कृष्णस्वामींचा तमाम भारतीयांना परखड सवाल
  •  भारतीय सैन्य दलांचे नेतृत्व, युद्धकौशल्य, सामग्री चीनपेक्षा सरस

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत – चीन हिंसक संघर्षाबाबत देशात गदारोळ उठलाय. जणू देशातल्या दोन बाजू एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्यात. एक बाजू १९६२ चे रडगाणे गात आहे. दुसरी बाजू मोदींवर आणि आपल्याच सैन्य दलांवर प्रश्नचिन्ह लावते आहे.

युद्धजन्य नाजूक परिस्थितीत हे सगळे टीव्हीवर, सोशल मीडियावर जाहीरपणे चाललेय… पण हे सगळे चीनधार्जिणे होतेय, हे समजत नाही का कोणाला?, असा परखड सवाल माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एस. कृष्णस्वामी यांनी केला आहे. द प्रिंट या वेबपोर्टलवर त्यांनी लेख लिहून त्यांनी तमाम भारतीयांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. कृष्णस्वामी हे २००१ ते २००४ या कालावधीत हवाई दल प्रमुख होते.

देशात उठलेल्या वादळावरून त्यांनी तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केलाय. भारताने आपले २० शूर जवान गमावले आहेत. ४० पेक्षा अधिक चीनी सैनिकांना मारलेय. एवढ्या गंभीर परिस्थितीत सरकारी धोरणांच्या कथित चुका, नेतृत्वाच्या कथित उणीवा, सैन्य दलांचे डावपेच, सैन्य दलांमधील कमी – जास्त यांच्यावर सार्वजनिक चर्चा, आरोप – प्रत्यारोप असले प्रकार ऐन युद्धजन्य परिस्थिती करायचे असतात का? सैन्य दले आपले डावपेच, व्यूहरचना, माघार, पुढाकार या हालचाली काय जगजाहीर करून करतात का? गुप्तता, शत्रूला चकवा, शत्रूचे कमकुवत दुवे ओळखून हालचाली करणे या बाबी सार्वजनिक चर्चेच्या ठरवायच्या असतात का? असे धारदार सवाल कृष्णस्वामी यांनी भारतातील राजकारणी, कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक या सर्वांना उद्देशून केले आहेत.

भारतात राजकीय, सैनिकी उणीवांवर, मतभेदांवर जाहीर चर्चा होण्याचे प्रकार चीनसारख्या शत्रू राष्ट्राला हवेच आहेत. त्यातही ते युद्धजन्य नाजूक परिस्थितीत होत असतील तर त्याचा फायदा उपटायला चीन तयारच आहे… पण हे आपणा सर्वांना समजायला नको का? ही वेळ आपल्यातील दुहीचे, फुटीचे प्रदर्शन करण्याची आहे की एकजूटीची वज्रमुठ उगारण्याची आहे, हे तमाम भारतीयांनी ठरवावे, असे कळकळीचे आवाहनही एअर चीफ मार्शल कृष्णस्वामी यांनी केले आहे.

एक अनुभवी सैनिक म्हणून मी सांगतोय, आपल्या सैन्य दलांचे नेतृत्व उत्तम, पहाडी युद्ध कौशल्य, अनुभव आणि सामग्री ही चीनी सैन्यापेक्षा सरस आणि आधुनिक आहे. चीनी नेतृत्वाकडे, सैनिकांकडे कौशल्य आणि अनुभवाची कमतरता आहे. आपल्या हवाई दलाची मारक क्षमता, अचूकता आणि वेग हे चीनी हवाई दलापेक्षा सरस आहे.

फक्त भारतीयांनी सरकारवर आणि सैन्य दलांवर विश्वास ठेवला पाहिजे. सरकारला आणि सैन्य दलांना चीनच्या हालचाली माहिती नव्हत्या का?, असले प्रश्न फिजूल आहेत. सरकारला आणि सैन्य दलांना चीनच्या हालचाली नक्की माहिती होत्या आणि आहेत. ते योग्य आणि आवश्यक कारवाई करत आहेत, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे. या देशासाठी लढलेला माजी सैनिक म्हणून मी हे विचार व्यक्त केले आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती