सेक्युलर भारत “असुरक्षित” वाटणाऱ्या आमिर खानसाठी इस्लामी तुर्की “सुरक्षित”

  • तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट आमीर खानला महागात; सोशल मीडियावर “मिस्टर परफेक्शनिस्ट” ट्रोल

वृत्तसंस्था

मुंबई : सेक्युलर भारत “असुरक्षित” वाटणाऱ्या आमिर खान आणि किरण रावला इस्लामिक तुर्की “सुरक्षित” वाटतोय.
आमिरने तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या एर्दोगन यांच्या पत्नी एमीन एर्दोगन यांची भेट घेतली असून त्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय.

आमिर खान सध्या आपला आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढाच्या शुटिंगसाठी तुर्कीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीतून त्याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तो तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगनसोबत दिसला आहे. या फोटोवरून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावला सेक्युलर भारतात असुरक्षित वाटत होते. परंतु, इस्लामिक तुर्कीमध्ये सुरक्षित वाटतेय. किरण रावला तिथे अनेक चांगले मित्र मिळाल्याचे आमिर खानने एमिन एर्दोगन यांना सांगितले.

आमिर खानसोबतचे फोटो एमीन एर्दोगनने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘मला जगप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. फिल्ममेकर आणि दिग्दर्शक इस्तंबुलमध्ये आहेत. मला हे जाणून घेऊन आनंद होत आहे की, आमिर लवकरच आपला आगमी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’चं शुटिंग तुर्कीतील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण करतील.’

आमिर खान आपल्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आलं आहे. हे कलम हटवल्याचा विरोध करणाऱ्या देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे. त्यामुळेच आमिर खान सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर तुर्कीने या निर्णयाचा विरोध केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हागिया सोफिया म्युझियनला पुन्हा मशीद बनवण्याच्या मुद्द्यावरून तुर्कीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं. एमीन अर्दोआन ज्यांची आमिर खानने भेट घेतली त्या नेहमी हिजाब घालतात. परंतु, तुर्कीमध्ये हिजाबवर बंदी होती. हिजाब घालून मुली युनिवर्सिटीत जाऊ शकत नव्हत्या. परंतु, अर्दोआन यांच्या पत्नी हिजाबमुळेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हत्या. काही लोक आमिरला या कारणामुळेही ट्रोल करत आहेत.

आमिर खान भारतात असहिष्णुता असल्याच्या आपल्या जुन्या वक्तव्यामुळेही ट्रोल होत आहे. तसेच पीकेमध्ये हिंदु धर्माची चेष्टा केल्याचाही आमिरवर आरोप लावण्यात येत आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनीही ट्वीट करत आमीर खानवर निशाणा साधला आहे. ते ट्वीट करत म्हणाले की, ‘म्हणजे हे सिद्ध झालं की, आमिर खानही तिनही खानांपैकी एक आहेत.’

So I have been proven right in classifying Aamir Khan as one of the 3 Khan Musketeers?

— Subramanian Swamy (@Swamy39) August 17, 2020

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*