सुशांत प्रकरण : महाराष्ट्र सरकार सीबीआय चौकशीविरोधात गेल्यास लोकांमध्ये संशय वाढेल; उज्ज्वल निकमांची स्पष्टोक्ती


  • “महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशीला आव्हान दिल्यास, ते कोणाला तरी वाचवत असल्याचे वाटेल”
  • “रिया चक्रवर्तीदेखील सीबीआय चौकशीला आव्हान देऊ शकत नाही, कारण तिने स्वतः याची मागणी केली होती”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार सीबीआय चौकशीच्या विरोधात गेल्यास लोकांमध्ये संशय वाढेल, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.

बिहार सरकारच्या विनंतीनंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याबाबत नोटिफीकेशनही जारी करण्यात आले आहे. सीबीआय तपासावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणे, कायदेशीररित्या बरोबर आहे का? सीबीआय राज्य सरकारच्या परवानगीशिवाय मुंबईत तपास करू शकते का? आता महाराष्ट्र सरकारने काय करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जेष्ठ उज्वल निकम यांनी दिली. दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी सीआरपीसी सेक्शन १७४ अंतर्गत प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यादरम्यान, काही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. बॉलिवूडमध्ये खान मंडळीचे वर्चस्व आहे, सुशांतच्या मृत्यू मागे खान मंडळीचा हात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पसरू लागल्या, असे सांगून निकम म्हणाले,

“सुशांतच्या मृत्यूच्या ४५ दिवसानंतर सुशांतचे वडील कृष्णकुमार सिंह यांनी पाटणामध्ये तक्रार दाखल केली. सुशांतसोबत त्याच्या घरात राहणारी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर संशय व्यक्त करून गंभीर आरोप लावले. एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिस मुंबईत दाखल झाले.

महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेवर संशय

मुंबई पोलिसांच्या वृत्तीवरून असे वाटत होते, की जणू बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही. त्यांचे म्हणणेही असेच होते. बिहार पोलिसांनी तपासात मदत करत नसल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर लावला. यामुळे बिहार पोलिस महासंचालकांनी आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबईला पाठवले. मुंबईत आल्यावर बीएमसीने कोरोना नियमांचे कारण सांगून त्यांना क्वारंटाइन केले. याला आधार बनवत काही इंग्रजी आणि हिंदी वृत्त वाहिन्यांनी प्रकरणात काहीतरी संशयास्पद आहे, मुंबई पोलिस काहीतरी लपवत आहे, असा संशय जनतेच्या मनात पसरला. यावरुन सुशांतने आत्महत्या केली नसून, त्यांना ही करण्यास भाग पाडल्याची चर्चा देशभरात रंगू लागली. काही सोशल मीडिया यूजर्सनी ही आत्महत्या नसून, खून असल्याचे म्हटले.”

उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, “यादरम्यान सुशांत सिंहची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्या प्रकरणाला सुशांतच्या आत्महत्येशी जोडण्यात आले. एका इंग्रजी वाहिनीने काही लोकांना आपल्या चॅनेलवर बोलावून उत्तर मागितले. प्रत्यक्षात जे काम पोलिसांनी करायला हवे, ते काम चॅनेलने केले. सुशांतच्या मित्रांनी कॅमेऱ्यासमोर आपल्या बाजू मांडल्या. सुशांतने म्हटले होते की, दिशाच्या आत्महत्येनंतर ही लोक मला जिवंत सोडणार नाही, असेही त्याच्या मित्राने म्हटले.”

या सर्व घडामोडीनंतर बिहार पोलिस महासंचालकांनी या प्रकरणात हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्सला मुलाखत देण्याचे सत्र सुरू केले. संशयित आरोपी रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात म्हटले की, सुशांत प्रकरणात तपास करण्याचा अधिकार बिहार पोलिसांना नाही. यानंतर बिहार पोलिस संचालकांनी मुंबई पोलिसांवर टीका केली. मुंबई पोलिस रियाच्या भाषेत बोलत असल्याचा संशय त्यांनी उत्पन्न केला, असेही निकम यांनी स्पष्ट केले.

उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केलेले मुद्दे :

  • तपासाबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना बिहार सरकारने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची केंद्राला विनंती केली. केंद्राने सुप्रीम कोर्टात शपथ-पत्र देऊन तपास सीबीआयकडे देत असल्याचे सांगितले. केंद्राने तात्काळ नोटिफिकेशन जारी केले.
  • कायद्याचा विद्यार्थी म्हणून या प्रकरणात मी काही मुद्दे उपस्थित करतो. महत्त्वाचे म्हणजे बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये शत्रुत्व प्रस्थापित करण्यात काही लोक यशस्वी झाले. हे शत्रुत्व फक्त राज्यांसाठीच नाही, तर देशासाठीही चांगले नाही. आमचे पोलिस चांगले का तुमचे चांगले, अशी परिस्थिती येणे योग्य नाही. पण, आरोपी कोणीही असो, कुठेही लपलेला असो, आमही त्याला शोधून काढण्यात कोणतीही कसर ठेवणात नाहीत, असे वक्तव्य करणयात बिहार पोलिस महासंचालक मागे हटले नाहीत.
  • कायद्यात असे सांगितले आहे की, ज्या ठिकाणी गुन्हा झाला आहे, त्या ठिकाणच्या न्यायालयालाच खटला चालवण्याचा अधिकार आहे. सुशांतने आत्महत्या मुंबईत केली, यामुळे या प्रकरणाचा खटला चालवण्याचा अधिकार मुंबई पोलिसांनाच आहे. परंतू, या घटनेची पार्श्वभूमी पाटण्यात असल्याचे के. के. सिंह यांच्या वकिलाचे म्हणणे आहे. सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगत, बिहार पोलिसांत तक्रार दिली.
  • महाराष्ट्र पोलिसांनी परिस्थिती स्पष्टपणे न सांगितल्यामुळे प्रकरण चिघळले

महाराष्ट्र पोलिसांनी कधीच आपली बाजू स्पष्टपणे मांडली नाही. यामुळे मुंबई पोलिसांवर लोकांचा संशय बळावला आणि बिहार पोलिसांवरील विश्वास वाढला. यानंतर मुंबई पोलिसांची इमेज खराब होईल, अशी वक्तव्ये येऊ लागली. त्यामुळेच हा वाद लवकर मिटायला हवा होता. पण, बिहार पोलिस महासंचालक वाहिन्यांवर मुलाखती देताना बिहार सरकारचा पाठिंबा त्यांना मिळत होता. यानंतर बिहार सरकार राजकारण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र पोलिसांनी केला.

सुशांत आणि दिशा यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली नाही. यामुळे विचित्र तक्र-वितर्क समोर येत आहेत. सुशांत आणि दिशाने स्वतः आत्महत्या केली, का त्यांना यासाठी कोणी प्रवृत्त केले, हे तपासातूनच स्पष्ट होऊ शकते. न्यायशास्त्रात म्हटले आहे की, तपासात उशीर झाल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती असते. सुशांतच्या आत्महत्येनंतर तो डिप्रेशनमध्ये होता, असे सर्वत्र सांगण्यात आले. पण, तो डिप्रेशनमध्ये का होता, याचा तपास घेण्यात आला नाही.

रिया चक्रवर्तीने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, सुशांत प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांना करण्याचा अधिकार नाही. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे, अशात रियाच्या याचिकेचा कोणताच अर्थ नाही. याचिकेत रियाने सीबीआयकडे प्रकरण गेल्यावरुन कोणतेच प्रश्न उपस्थित केले नाहीत. याउलट तिने देशाच्या गृहमंत्र्यांना प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. वास्तविक, संबंधित राज्याला विचारल्याशिवाय सीबीआय प्रकरणाचा तपास करू शकत नाही. त्यामुळे बिहार पोलिसांच्या मागणीवर सीबीआय चौकशी करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे. अशात महाराष्ट्र सरकारने कोर्टात याचिका दाखल केल्यास, महाराष्ट्र सरकारवरील संशय वाढला जाऊ शकतो.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती