सीएएविरोधी आंदोलनाच्या दारूगोळ्यामुळेच बंगळुरूत दंगल, बिलाल बागेत नसिरुध्दीन शहांनीही केले होते भाषण

देशात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलनाने धर्मांधतेचा दारुगोळा मुस्लिम समाजाच्या मनात भरला आहे. बंगळुरू येथील दंगलीतून हे स्पष्ट झाले आहे. दंगलग्रस्त भागातील बिलाल बाग येथे सीएए विरोधात मोठे आंदोलन झाले होते.


वृत्तसंस्था

बंगळुरू : देशात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलनाने धर्मांधतेचा दारुगोळा मुस्लिम समाजाच्या मनात भरला आहे. बंगळुरू येथील दंगलीतून हे स्पष्ट झाले आहे. दंगलग्रस्त भागातील बिलाल बाग येथे सीएए विरोधात मोठे आंदोलन झाले होते.

बंगळुरूतील घटनेने सीएए विरोधातील आंदोलनाने पेटविलेली मने उजेडात आली आहेत. पाच महिन्यांपूर्वी संसदेत सीएए कायदा मंजूर झाल्यावर देशात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. दिल्लीतील शाहीन बाग येथील आंदोलनाच्या धर्तीवर ही आंदोलने होती. बंगळुरुतील बिलाल बाग येथेही आंदोलन झाले होते. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शहा आणि दलीत नेता जिग्नेश मेवाणी यांनी येथे येऊन भाषणे केली होती.


१४ फेब्रुवारी २०२० रोजी ही सभा झाली होती. रात्री नऊ वाजता झालेल्या सभेत शहा म्हणाले होते की महिलांचे आंदोलन पाहून त्यांच्यातही बोलण्याचे साहस आले आहे. रस्त्यावर उतरण्यासाठी महिलांना कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले होते. मेवानी यांनी या महिलांच्या चेहऱ्यावरील चमक पाहून त्या क्रांतीकारी आहेत असे वाटत असल्याचे सांगितले होते.

या काळात बिलाल बाग येथे दररोज भडकाऊ भाषणे होत होती. भारताविरोधी घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यामुळे दंगलीसाठी जमीन तयार करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून ही दंगल झाल्याचे म्हटले जात आहे.

विशेष म्हणजे दिल्लीतील शाहीन बाग येथील आंदोलनानंतर दिल्लीतही दंगल पेटली होती. यामध्ये अनेकांचे प्राण गेले होते. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. त्याच पध्दतीने बंगळुरूमध्ये घडत आहे. त्यामुळे फेसबुक पोस्टचे निमित्त होऊन हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी स्थानिक आमदाराच्या घराला वेढा दिला आणि तोडफोड केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*