सामना बाळासाहेबांचा थोडच राहिलाय?; तो तर आता तीन तोंडांचे मुखपत्र…!!


पवारांपुढे उद्धवजी पण गारद का?, फडणवीसांचा संजय राऊतांना टोला


विशेष प्रतिनिधी

जळगाव : “सामना आता बाळासाहेब ठाकरे यांचा थोडाच राहिलाय?, तो तर आता तीन तोंडांचे मुखपत्र बनलाय. आणि एक शरद, बाकीचे गारद असतील तर शरद पवारांपुढे उद्धव ठाकरे पण गारद झालेत का?”, असा बोचरा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली असून ‘एक शरद! सगळे गारद!!’ अशा मथळ्याखाली ती प्रसिद्द केली जाणार आहे. त्यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. पवारांपुढे सगळे म्हणजे उद्धवजी पण गारद का? असा टोला त्यांनी लगावला. “सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचे काम करत आहे.

सामना आधी शिवसेनेचे मुखपत्र होती पण आता त्याला तिन्ही पक्षांच्या मुखपत्राचे काम करावे लागत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली.

“करोनाचा सामना करत असताना आम्हाला व्हायरसचा सामना करायचा आहे. लढा व्हायरसशी आहे आहे नंबरशी नाही. सरकार सातत्याने नंबर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून ते चुकीचं आहे. टेस्टिंग आणि व्यवस्था वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात टेस्टिंगची संख्या कमी आहे. करोनाला रोखण्यासाठी टेस्टिंग वाढवणं सर्वात महत्त्वाचं आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

पारनेरमधील राजकारणावरूनही फडणवीस यांनी टीका केली. कोणत्या जगात ही मंडळी जगत आहेत हे माहिती नाही. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन करोनाचा सामना कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. सरकारमध्ये विसंवाद असून महाराष्ट्राला याचा फटका बसतोय.

सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे. सामना आधी शिवसेनेचे मुखपत्र होते पण आता तिन्ही पक्षाचे मुखपत्र आहे. दुर्दैवाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली जी तत्त्वे पाळली, ज्यांचा त्यांनी कायम विरोध केला सामना आज त्यांचीच पाठराखण करतोय, अशी टीकाही त्यांनी केली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती