राष्ट्रवादी–काँग्रेसकडे स्वतःचे उमेदवार नसल्याने विधान परिषदेसाठी वंचितचे उमेदवार पळवले, प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र


  • यशपाल भिंगे आणि अनिरूद्ध वनकर यांचे राजकारण औट घटकेचे, त्यांची राजकीय उपयुक्तता संपली

विशेष प्रतिनिधी

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे विधान परिषदेसाठी स्वतःचे उमेदवार नव्हते म्हणून त्या पक्षांच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पळविल्याचे टीकास्त्र प्रकाश आंबेडकर यांनी सोडले आहे.

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नावे राज्यपालांकडे नमंजूरीसाठी पाठविली आहेत. यात काँग्रेसच्या कोट्यातून कलाकार आणि गायक अनिरूध्द वनकर आणि राष्ट्रवादीकडून प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांची नावे सुचविण्यात आली आहेत. हे दोन्ही नेते वंचित बहूजन आघाडीकडून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढले आहेत.

प्रा. डॉ. यशपाल भिंगे वंचितकडून नांदेडमधून लोकसभा लढले होते. त्यांनी सव्वा लाखांच्या जवळपास मते घेतल्यानेच नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता. तर गायक आणि कलाकार अनिरूध्द वनकर यांनी चंद्रपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघासाठी विधानसभा लढवली होती. या दोन्ही नेत्यांना थेट काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या गळाला लावल्याने प्रकाश आंबेडकर काय बोलतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आज अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी यावर मौन सोडले आहे. ते म्हणाले, की राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे उमेदवार नसल्याने त्यांनी डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूध्द वनकर या आमच्या दोन्ही उमेदवारांना पळविले. या दोन्ही कार्यकर्त्यांच्या जाण्याचे दु:ख आहेच. मात्र, या दोघांचेही राजकारण औटघटकेचे आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने ना पक्षाला खिंडार पडले, ना पक्षाचे नुकसान झाले हे आंबेडकरांनी स्पष्ट केले. आपल्याला अनेकजण सोडून गेलेत. मात्र, दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्या नेत्यांची उपयुक्तता संपल्यांचे त्यांनी सांगितले.

मंदिरे न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आज प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारला शिर्डी, सिद्धीविनायकाचा पैसा चालतो. मग मंदिरे का चालत नाहीत?, असा बोचरा सवाल आंबेडकरांनी ठाकरे – पवार सरकारला केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना वारकऱ्यांपासून काही समस्या आहेत का? की वंचित बहुजन आघाडी वारकऱ्यांच्या सोबत आली म्हणून मंदिरे उघडण्यास वेळ लागत आहे?, असा सवाल आंबेडकरांनी सरकारला केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख उपहासाने आंबेडकरांनी ‘आचार्य’ असा करीत त्यांना टोला लगावला आहे. सरकार आता आळंदीच्या ‘आचार्यां’चं ऐकणार का?, असे विचारत त्यांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनाही टोला लगावला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती