राजस्थानातील घडामोडींमुळे महाविकास आघाडीत धास्ती, शरद पवार पुन्हा उध्दव ठाकरे यांच्या भेटीला


राजस्थानातील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांच्या दारात जावे लागले. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई: राजस्थानातील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रावादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांच्या दारात जावे लागले. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

राजस्थानातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पोहचले.

सायंकाळी सुमारे तासभर ही भेट झाली. ही बैठक संपल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिथे दाखल झाले. पवार यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी दीर्घ चर्चा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

महाविकास आघाडीचं सरकार चालवत असताना तिन्ही पक्षांत सुसंवाद असायला हवा, अशी अपेक्षा गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून व्यक्त होत आहे. याअनुशंगाने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती.

शरद पवार यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीतही यावर आपले मत स्पष्टपणे मांडलं होतं. त्यातच राजस्थानात काँग्रेस पक्षातील गृहकलहातून जे अस्थिरतेचे ढग दाटले आहेत तशी कोणतीही वेळ महाराष्ट्रावर येऊ नये, असे तिन्ही पक्षांना वाटत आहे.

त्यातूनच आजच्या भेटीगाठी घडल्याची चर्चा आहे. सरकारमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना एकवाक्यता असावी, आधी चर्चा करून मगच निर्णय घ्यावा, तिन्ही पक्षांनी समन्वय राखावा, अशा विविध मुद्द्यांवर आज चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती