“राजकारणासाठी पैसा आणि जात नाही” म्हणून नांदेडच्या मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या

  • “राजसाहेब मला माफ करा, माझ्याकडे राजकारणाला पैसे आणि जात नाहीत,”; २७ वर्षांच्या सुनील ईरावारने घेतला गळफास

विशेष प्रतिनिधी

नांदेड : “अखेरचा जय महाराष्ट्र, यापुढे  राजकारण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत” असे सांगून नांदेडमधील मनसेचे शहराध्यक्ष सुनील ईरावार या २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली.

सुनील ईरावार हा शहरातील गोकुंदा परिसरात राहत होता. सुनिल हा मनसेच्या शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होता. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास सुनीलने राहत्या घरात साडीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिलने तरूण वयात जीवन यात्रा संपवल़्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घरातील सदस्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुनिलचा मृतदेह ताब्यात घेतला. घराची पाहणी केली असता सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाई़ड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.

‘अखेरचा जय महाराष्ट्र’

“यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे पुढील माझ्या मर्जीप्रमाणे संपवत आहे. तरी माझ्यामुळे कुणालाच त्रास देऊ नका.

राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि दोन्हीही माझ्याजवळ नाही.

जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे”

आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पूदादा, मला माहिती आहे मी माफ करण्याचा लायकीचा नाही, तरी तुम्ही मला सर्वजण मला माफ करशाल अशी आशा बाळगतो.

आई मला माफ करं,

तुझाच सुनील

सुनीलची सुसाईट नोट वाचून शहरातील मनसे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सुनीलने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणीत आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

सुनील हा राज ठाकरे यांचा कट्टर चाहता होता. त्यामुळेच तो मनसेत सहभागी झाली होता. बघता बघता तो शहराध्यक्षही झाली. १४जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘माझ्या दैवताचा वाढदिवस’ म्हणून त्याने राज यांचा वाढदिवस साजरा केला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*