मोदी सरकारचे आक्रमक पाऊल; चीन सीमेवर भारतीय सैन्याला firearms वापरण्यास मूभा ; संयमी नियमांमध्ये महत्त्वाचे बदल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत – चीन हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने भारतीय सैन्याला असाधारण परिस्थितीचा मुकाबला करताना firearms मूभा दिली आहे. लडाखमध्ये चिनी सैन्याच्या कुरापतखोरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी आवश्यक पाऊल भारताने उचलल्याचे मानले जात आहे.

चिनी कुरापतखोरी विरोधात आवश्यक कारवाई करण्यास भारतीय सैन्य दलाला खुली सूट देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले होते. त्यावर ताबडतोब अंमलबजावणी करून rules of engagement (ROE) मध्ये बदल करण्यात आले.

लडाख आणि सीमेवरील अन्य भागांमध्ये चिनी सैन्य मोठ्या झुंडीने घुसखोरी करते. धारदार शस्त्रांनी अमानुष हल्ले करते. भारतीय सैन्याच्या गस्तीच्या वेळी, कामाच्या वेळी अडथळा आणते. त्यावेळी त्यांना मर्यादित साधनांनी रोखणे अवघड होते. अशा आणीबाणीच्या वेळी स्थानिक कमांडर्सच्या सल्ल्याने भारतीय सैनिक firearms वापरू शकतील, यासाठी rules of engagement मध्ये म्हणजे दोन्ही देशांची सैनिक समोरासमोर असतानाच्या नियमांमध्ये बदल करून हा सुधारित आदेश काढण्यात आला आहे.

यामुळे भारतीय सैन्य दलावरचे एकतर्फी बंधन पाळण्यावरचे बंधन दूर झाले आहे. १९९३ च्या नरसिंह राव – ली फंग कराराने व नंतरच्या करारांनी दोन्ही देश बांधले गेले आहेत. भारतीय सैनिक या करारातील तरतुदींचे पालन करतात. चीनकडूनही गालवन संघर्षात बंदूकीतून गोळी सुटली नाही. पण तरीही त्यांचे भारतीय हद्दीत घुसण्याचे उद्योग थांबलेले नाहीत.

भारतीय हद्दीत सैन्याच्या वेगवान हालचालींना उपयोगी ठरेल, अशा पायाभूत सुविधा रस्ते, पूल, हवाई तळ भारताने उभारू नयेत, यावर चिनी सैन्याचा कटाक्ष आहे. म्हणून ते वारंवार घुसखोरी करून भारतीय हद्दीत पायाभूत सुविधा उभाण्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात. चिनी सैन्याच्या व्यत्ययाचा थेट आणि परिणामकारक मुकाबला करण्यासाठी ROE मध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यानुसार हा बदल करून असाधारण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी firearms च्या वापराची मूभा भारतीय सैन्याला देण्यात आली आहे.

गालवन खोऱ्यात चिनी सैन्याच्या झुंडीने लोखंडी रॉड, धारदार तारा गुंडाळलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर प्राणघातक हल्ले केले त्यावेळी आपल्या जवानांकडे firearms होती. पण त्यांनी संयम दाखवून ती वापरली नाहीत. पण भविष्यात अशा प्रकारच्या हिंसक संघर्षात भारतीय सैन्याला अनावश्यक संयमाचे बंधन पाळावे लागणार नाही. त्यांना अधिकाराने firearms वापरता येऊन आपली जीवितहानी टाळता येऊ शकेल आणि कुरापतखोर चिनी सैन्याला जरब बसवता येऊ शकेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती