मुंबई महापौर परिवाराचा झोल, कंपनीच्या पत्यावर ८ बोगस कंपन्या

विशेष प्रतिनिधी 

मुंबई ः मुंबईच्या महापौरांची कंपनी ज्या पत्त्यावर रजिस्टर आहे. त्याच पत्त्यावर ८ बोगस कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. त्या सगळ्याच कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजेअशी मागणी भाजप नेते डॉ किरीट सोमैया यांनी केली आहे.

याबाबत सोमैय्या यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले असून यासंदर्भातील मालकी हक्कआर्थिक हितसंबंधव्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील खुलासाबाबत (disclosure) स्पष्टता हवी असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

महापौरांच्या कंपनीला महापालिकेचं कंत्राट मिळाल्याचं यापूर्वीच सिद्ध झालं आहे. मुंबईच्या महापौर आणि त्यांचे सुपुत्र यांची किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वरळीच्या गोमटी जनता सोसायटीजी के कदम मार्गलोअर परेलमुंबई ४०००१३ या पत्त्यावर रजिस्टर आहे. याच पत्त्यावर आणखी ८ ड्युबिअस कंपन्याही रजिस्टर आहेततेव्हा या सर्व प्रकरणाबाबत योग्य तो खुलासा व्हावा मागणी भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे.

ह्या कंपन्या ची नावे :

1. वेअसेल वेंचर्स प्रा. लि. (Weasel Ventures Pvt Ltd)

2. फिक्स 24*7 फ़िजिओ प्रा. लि. (Fix 24*7 Physio Pvt Ltd)  

3. एम्को ग्लोबल प्रा. लि. (Emco Global Pvt Ltd)

4. हॅमस्टर वेंचर्स प्रा. लि. (Hamster Ventures Pvt Ltd)

5. लिली वेंचर्स प्रा. लि. (Lily Ventures Pvt Ltd)

6. एम्को वेंचर्स प्रा. लि. (Emco Ventures Pvt Ltd)

7. डी अॅण्ड बी आय अॅक्सेस एलएलपी (D & B I ACcess LLP)

8. टीझल व्हेंचर्स प्रा. लि. (Teasel ventures Pvt Ltd)

दरम्यान, महापौरपदाचा गैरफायदा घेत कोरोना काळातही मलीदा लाटण्याचा प्रकार मुंबईतील शिवसेना पदाधिकारी करत आहेत का, असा संशय या बोगस कंपन्यांमुळे निर्माण झाला आहे. सोमैय्या यांच्या तक्रारीनंतर अद्यापपर्यंत मुंबई महापौरांनी कोणताही खुलासा न केल्याने या संशयात वाढ होऊ लागली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिका ताब्यात असणाऱ्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप याहीपुर्वी झाले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*