महाराष्ट्र संकटात; मुख्यमंत्री घरात; मंत्री मुख्यमंत्र्यांच्या लटक्या समर्थनात

  • माजी मुख्यमंत्री मदतीसाठी शेतकऱ्यांच्या दारात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : चांदा ते बांदा महाराष्ट्र कोरोना आणि महापूराच्या संकटात, मुंबई गेली खड्ड्यात आणि मुख्यमंत्री स्वत:च्याच घरात. अशी महाराष्ट्राची स्थिती असताना माजी मुख्यमंत्री मदतीसाठी शेतकऱ्यांच्या दारात…!!

… तर तिघाडी सरकारमधील मंत्री, आमदार मुख्यमंत्र्यांच्या लटक्या समर्थनात. हे चित्र आजच्या घडीला महाराष्ट्राचे आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फास घट्ट झालाय. आकड्याने विक्रम पार केलाय. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पूराने थैमान घालून घरे – दारे उद्धवस्त केलीत. शेते झोपवून गिळंकृत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र घरात आहेत. ते १५ – १५ तास काम करतात, असा काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दावा केला.

राष्ट्रवादीचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याचे समर्थन केले. पण पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि आरेची ६०० एकर जमीन जंगलासाठी संरक्षित या खेरीज उद्धव ठाकरे active कुठे दिसले?, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्राच्या समस्यांच्या डोंगर तिघाडी सरकारच्या समर्थक वाहिन्या, पेपर यांनी पोखरून काढले पण “मुख्यमंत्री मातोश्रीतून कारभार करीत आहेत,” एवढ्या वाक्याच्या उंदीर बाहेर काढण्याखेरीज ते देखील काही करू शकले नाहीत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्व विदर्भात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या दारात पोहोचलेत. महाराष्ट्राचे मंत्री तिथे पोहोचून मदत करायचे तर दूरच उलट शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार फडणवीसांवर दुगाण्या झोडताहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लटके समर्थन करीत आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना असताना रोहित पवार उद्धव ठाकरे यांच्यासाठी धावून आलेत.

राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसाठी बॅटिंग केलीय. देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत काही प्रतिप्रश्न विरोधकांना विचारले आहेत.

राज्यात कोरोना महामारीमुळे परिस्थिती वाईट असताना राज्य सरकार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, की बदल्यांमध्ये आम्ही बिझी आहोत असे ते बोलतायत, मग आम्हीही म्हणतो की, राज्य अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात? त्यांना राजकीय स्टेटमेंट करण्याची सवय आहे. कोल्हापुरात पूर असताना कर्नाटकची चूक झाली होती, तसे त्यांनी कबूल केले. आता पूर्व विदर्भातील पुराबाबत एमपी सरकारने विश्वासात घेतले नसल्याचे दिसतेय, अशा दुगाण्या रोहित पवारांनी झोडल्या.

पंतप्रधान कुठे आहेत?

मुख्यमंत्री बाहेर नाहीत म्हणतायत मग पंतप्रधान कुठे आहेत? ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना? जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. पांडुरंग रायकर यांच्याबाबतीत जे झालं ते वाईट झालं, आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. जे झालं ते चुकीचं झालं. यात शहानिशा करण्याची गरज आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले असल्याची सारवासारव रोहित पवार यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*