भ्रष्टाचाराची गटारी; राजीव गांधी फाऊंडेशनला चक्क पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतूनही देणगी!

  • सोनिया – राहुलग्रासित सरकारची “कमाल”

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना संकटकाळात पीएम केअर फंडाचे काम पारदर्शकपणे सुरू असताना केवळ राजकीय वैमनस्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चिखलफेक करणाऱ्या काँग्रेसने तर अशाच फंडातून भ्रष्टाचाराची गटारी साजरी केली आहे.

सोनिया – राहुलग्रासित यूपीए १ सरकारच्या काळात राजीव गांधी फाऊंडेशनला पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून देणगी मिळवून घेतल्याचे कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे. फाऊंडेशच्या देणगीदारांच्या यादीत पंतप्रधान आपत्ती निवारण निधीतून देणगी घेतल्याचा उल्लेख आढळला आहे.

राजीव गांधी फाऊंडेशन ही खासगी संस्था आहे. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून कोणत्याही खासगी संस्थेस देणगी देता येत नाही. पण सोनिया गांधी या फाऊंडेशच्या प्रमुख आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, डॉ. मनमोहन सिंग, पी. चिदंबरम हे त्याचे विश्वस्त आहेत. त्यामुळेच ही देणगी देण्यात आल्याचे उघड आहे.

 

या मुद्यावरून भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला घेरले आहे. पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ट्विट करून काँग्रेसचा डीएनए भ्रष्टाचाराचा आहे, अशी टीका केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून देणगी घेऊन तर काँग्रेसने भ्रष्टाचाराची गटारी साजरी केल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी देखील काँग्रेसला तिखट सवाल केले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*