भारतीयांच्या इनोव्हेशनच्या बळावर “लेट द गेम बिगिन”; मोदींचा नवा मंत्र

  • प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरेचा मन की बातमधून निर्धार
  • जगाच्या खेळणी उद्योगात भारतीय खेळण्यांनाही स्थान मिळवून देण्याचे आवाहन
  • देशाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला नमन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीयांच्या इनोव्हेशनच्या बळावर “लेट द गेम बिगीन” चा नवा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारताला दिला. मोदींनी ६८ व्या मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतोय. उत्सव आणि पर्यावरणाचं दृढ नातं आहे. निसर्ग संवर्धनासाठी उत्सवाचं आयोजन केलं जात असल्याचं मोदींनी सांगतिलं. कोरोनाच्या कठिण काळातही शेतकऱ्यांनी मोठं योगदान दिलं असून अन्नदाता शेतकऱ्यांना मोदींकडून मन की बातच्या सुरुवातीला नमन करण्यात आलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “खेळण्यांच्या उद्योगावर भारतीयांनी भर दिला पाहिजे. कोरोना काळात मुलं वेळ कसा घालवत असतील? त्यांच्या भवितव्याबाबत मंथन केलं पाहिजे. जगभरात खेळण्यांची मोठी बाजारपेठ आहे. मात्र, खेळण्यांच्या या ग्लोबल इंडस्ट्रीत भारताचं योगदान अतिशय कमी अाहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पुढे जात असून, भारतातील मुलांना भारतातच तयार केलेली नवीन खेळणी कशी मिळतील यावर विचार सुरू आहे.”

खेळण्यांची ७ लाख कोटींची मोठी बाजारपेठ आहे. टॉय इंडस्ट्री अतिशय व्यापक आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीत भारताला पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. लोकल खेळणी वोकल करण्याचा प्रयत्न करू या. पर्यावरणालाही अनुकूल असतील अशी खेळणी तयार करावीत, खेळण्यांसह, मोबाईल, कॉम्प्युटर गेम्ससही भारतीय असावेत, असे आवाहन मोदींनी केले. भारतीयांची इनोव्हेशनची क्षमता जगभरात लोकप्रिय आहे. भारतीयांच्या याच इनोव्हेशच्या जोरावर ‘लेट द गेम बिगिन”चा नवा मंत्र मोदींनी दिला आहे. स्टेप्स सेट गो, चिंगारी यांसारख्या काही भारतीय ऍप्सचं मोदींनी कौतुक केलं असून, भारतीय ऍप्स वापरण्याचं आवाहनही केले.

मोदी म्हणाले, “प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करायचं अाहे. आता सुरू झालेले छोटे-छोटे स्टार्टअपच पुढे जाऊन मोठ्या कंपन्या होणार आहेत. आताच्या मोठ्या कंपन्याही कधी-काळी स्टार्टअपचं होत्या, यासाठी सर्वांनी पुढे येऊन इनोव्हेट करणं आवश्यक अाहे. नेशन आणि न्यूट्रीशनचा मोठा संबंध अाहे. जसं पोषक अन्न असतं तसाच आपला चांगला मानसिक विकास होता. मुलांच्या पोषणाप्रमाणेच आईलाही तितकंच पोषण मिळणं गरजेचं आहे. मुलं, मातांच्या पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे. सप्टेंबरमध्ये पोषण महिना साजरा करणार असून, ज्या भागात जे उत्तम पिकतं, त्यानुसार भारतीय कृषी कोश तयार करण्यात येत आहे.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*