बारामतीच्या कौटुंबिक बैठकीत झाली का पार्थची नाराजी दूर?

  • शरद पवारांनी “फटकारल्याचे” media reporting बातम्या आता पार्थच्या “नाराजीत” convert झाले

विशेष प्रतिनिधी

बारामती : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली.  यानंतर नाराज असलेल्या पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी बारामतीत बैठक झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार, पार्थची आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्त चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पण पार्थ यांची नाराजी यातून दूर झाली का?, यावर सूत्रे मौन बाळगून आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचे मीडिया रिपोर्टिंगही शरद पवारांनी “पार्थला जाहीर फटकारले” यापासून “पार्थची नाराजी” असे बदलले आहे.

स्वातंत्र्य दिनापूर्वी दोन दिवस आधी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचा विषय स्वातंत्र्य दिन उलटून गेल्यानंतरही थांबलेला नाही. दोन्ही बाजूंनी तो थांबवलेलाही नाही. या प्रकारावर फक्त अजित पवारांची बहिण विजया पाटील यांची प्रतिक्रिया आली. “पवार साहेबांना एवढे रागवलेले कधीच पाहिले नव्हते. पार्थच्या निमित्ताने त्यांना वेगळ्या कोणाला संदेश द्यायचा आहे का?”, असा सवाल त्यांनी केला होता.

बारामतीत बैठक झाली तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार पुण्यातील शिवाजीनगरच्या मोदीबागेतील घरी पोहोचले आहेत. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर पवार प्रथमच पुण्यात आले आहेत.

शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार १३ ऑगस्ट रोजी सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु यावेळी पार्थ आणि सुप्रिया सुळे यांच्यातच चर्चा झाली. मात्र शरद पवार आणि पार्थ यांची भेट झाली नव्हती. बारामतीच्या बैठकीतही सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या.

शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावरील वक्तव्यानंतर पवार कुटुंबात नव्या वादाला तोंड फुटले. मीडियासमोर शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर असल्याचं म्हटलं होतं. तसंच, पार्थ यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या अजित पवार यांनीही जाहीररित्या कोणतेही वक्तव्य केलले नाही तर याविषयी आपल्याला कोणतेही भाष्य करायचे नाही, असे पार्थ पवार म्हणाले होते.

शरद पवार काय म्हणाले होते?

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचे वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर १००% टक्के विश्वास आहे. पण कोणाला असे वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचे कारण नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*