प्रणवदांना राष्ट्रपती करण्याचे श्रेय उद्धव यांनी बाळासाहेबांकडे ओढून घेतले

  • श्रद्धांजली प्रणवदांना; चिमटे भाजपला

वृत्तसंस्था

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी श्रद्धांजली अर्पण केली. पण यावेळी अनाठायी दावा करत प्रणवदांना राष्ट्रपती करण्याचे श्रेय शिवसेनाप्रमुखांकडे ओढून घेतले. प्रणवदांच्या आठवणींना उजाळा देताना भाजपला चिमटे काढले.

मुख्यमंत्री म्हणाले, “प्रणवदांचे कुणाशी वैर नव्हते. भाषणबाजी पेक्षा त्यांना काम जास्त महत्वाचे वाटे. प्रणवदा यांनी अनेकदा त्याकाळी सरकारला वाचवले. पक्षाला वाचवले. जेव्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणवदांना उघड पाठिंबा दिला. त्यावेळी प्रणवदा शरद पवार यांच्याबरोबर मातोश्रीवर आले होते. आमची तेव्हा पहिली भेट होती. समोरच्याचा आब राखून बोलणे, ऐकून घेणे अशा गोष्टी त्यांच्या स्वभावात पाहायला मिळाल्या.”

मुख्यमंत्री म्हणाले, “एकदा ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडून मला बोलावणे आले. मी भेटल्यावर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयासाठी अभिनंदन केले. ते म्हणाले, मला वाटले नव्हते की मी राष्ट्रपती होईन. शिवसेनाप्रमुखांमुळे मी राष्ट्रपती झालो. हे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे.
हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण रात गयी बात गयी ,खुर्ची मिळाली की विचार करत नाहीत.”_ अशा शब्दांत त्यांनी भाजपला टोला लगावला.

वास्तविक प्रणवदांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत काँग्रेस आघाडीकडे बहुमत होते. शिवसेनेच्या मतांची प्रणवदांना गरज नव्हती. मात्र शिवसेनाप्रमुखांनी एक विद्ववान म्हणून प्रणवदांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी या पाठिंब्याचा आणि प्रणवदांच्या राष्ट्रपती होण्याचा श्रद्धांजली वाहताना अस्थानी आणि असमयोचित उल्लेख केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*