पार्थवरून आधी “डँमेज”, नंतर “कंट्रोल”; सिल्वर ओकवर काका – पुतण्यांमध्ये चर्चा

  • सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीला मान्यता दिल्यानंतर “मातोश्री”चा राग शरद पवार कसा काढणार?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पार्थ पवारांवर “अपरिपक्क” असा शिक्का मारून अजित पवारांना “डँमेज” केल्यानंतर शरद पवारांनी “कंट्रोल” सुरू केला आहे. सिल्वर ओकवर काका – पुतण्यांची बैठक सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित आहेत.

अजित पवारांची समजूत काढण्यासाठी ही बैठक असल्याची चर्चा आहे. पवारांनी नातवाबद्दल आणि आपल्या मुलाबद्दल एवढे blunt विधान केल्याबद्दल अजित पवार आणि सुनेत्रा पवार नाराज आहेत.

सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारा पार्थ इममँच्युअर आहे. त्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,” असे सांगून शरद पवारांनी आपल्या कुटुंबातच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना डँमेज केल्याचे मानले जाते. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थला उमेदवारी देण्यासाठी पवार घराण्यातील सर्वांचा विरोध असताना सुनेत्रा पवारच अतिआग्रही होत्या, अशी खात्रीलायक माहिती होती.

पण पवारांनी आज एवढे blunt विधान करून पार्थ पवारांच्या विषयाला ब्रेकच लावल्याचे मानले जाणे स्वाभाविक आहे. शरद पवारांच्या विधानावर अद्याप अजित पवारांची प्रतिक्रिया आलेली नसली तरी ते नाराज झाले. म्हणूनच अधिक डँमेज होण्यापूर्वी कंट्रोल करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून सिल्वर ओकवरील बैठकीकडे पाहिले जाते. पार्थ पवारांनीही मला काही बोलायचे नाही, असे सांगून सध्या भाष्य टाळले आहे. पण या प्रकरणात सिल्वर ओकमधील बैठकीनंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया नेमकी काय येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

परंतु, काहीही झाले तरी आपल्याच कुटुंबातील एका सदस्याबाबत शरद पवारांनी प्रथमच एवढी blunt प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचे पडसाद कुटुंब आणि राष्ट्रवादीत उमटले आहेत.

पार्थला कवडीचीही किंमत नसल्याचे ठरवताना शरद पवारांनी बाळासाहेबांच्या नातवाभोवती फिरू शकणाऱ्या सीबीआय चौकशीचा मार्गही मोकळा केल्याचे मानावे लागेल. कारण सीबीआय चौकशी नकोचा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्यचा आहे. परंतु प्रकरण सुप्रिम कोर्टात आहे. तेथे सरकारने सीबीआय चौकशी विरोधात भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांनी सीबीआय चौकशीला विरोध नसल्याची भूमिका घेणे हा एक प्रकारे आदित्यभोवती फिरू शकणाऱ्या सीबीआय चौकशीला consent देण्याचाच प्रकार असल्याचे मानावे लागेल. यानंतर शिवसेना नेतृत्व नाराज झाल्यानंतर शरद पवार त्यांची समजूत कशी आणि कधी काढणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.

… म्हणून पार्थवर शरद पवार नाराज

  •  पार्थ पवार यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला शुभेच्छा पत्र
  •  सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट
  •  पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यात पुढाकार घेतल्याचा राजकीय आरोप
  •  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार राजकारणात सक्रिय नाहीत.

पार्थवर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या सोशल मीडियातून खिल्ली उडवायलाही सुरवात झाली आहे. “आता यांचाच पक्षातले लोक बोलतात पवारांच वय झालाय त्यांच्या बोलण्याकडे काहीही लक्ष देऊ नका.”

“पार्थ पवार जर इममच्युअर होते तर राष्ट्रवादीने त्यांना निवडणुकिला उमेदवारी का दिली होती ? पार्थ पवारांना राष्ट्रवादी मध्ये युवा नेते म्हणून बघितले जाते, हे विसरू नका.”, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*