पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह-लडाखमध्ये; बहादूर जवानांशी स्फूर्तिदायक चर्चा; चीनलाही सशक्त “संदेश”

वृत्तसंस्था

लेह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लेह लडाखचा दौरा केला. बहादूर जवानांशी त्यांनी स्फूर्तिदायक संवाद साधला. प्रत्यक्ष युद्धभूमीवर अचानक जाऊन मोदी यांनी जवानांचे मनोधैर्य वाढविलेच, पण चीनलाही सशक्त “संदेश”ही दिल्याचे मानले जात आहे.

  • सैन्य दलांचे संयुक्त प्रमुख जनरल बिपिन रावत हे त्यांच्या समवेत आहेत.
  • भारताची जनता संपूर्णपणे जवानांच्या पाठिशी उभी असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
  • त्यांनी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स, १४ कॉर्प्स कमांडच्या जवानांशी संवाद साधला. पंतप्रधान सध्या नीमूमध्ये आहेत.
  • चीनशी संघर्षात २० जवान गमावल्यावंतर जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हा दौरा अत्यंत मोलाचा आहे.
  • पंतप्रधानांनी भारतीय हवाई दल, सैन्य दलांच्या लष्करी तयारीचा आढावा घेतला. १४ कॉर्प्स कमांडच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना भारतीय फ्रंट पोस्टची तपशीलवार माहिती दिली.

लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी पंतप्रधानांना लेह – लडाखमधील सीमावर्ती स्थितीची, भारतीय सैन्य दलांच्या तयारीची तपशीलवार, वास्तव माहिती दिली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा आज नियोजित लेह – लडाख दौरा होता. त्यांच्या समवेत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दौऱ्यावर जाणार होते. प्रत्यक्षात सकाळी पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर लेहच्या हवाई तळावर उतरले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या समवेत जनरल नरवणे हे देखील आहेत. Ground zero वरील परिस्थितीची माहिती पंतप्रधानांनी घेतली.

 

काँग्रेसने मात्र पंतप्रधानांच्या लेह – लडाख दौऱ्यावर तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंदिराजी लेह दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. आता मोदी लेहमध्ये गेले आहेत. आता बघू या पुढे काय होते ते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*