पंतप्रधानांचा अनोखा पुढाकार; कोरोना योद्ध्यांचा स्वातंत्र्यदिनी होणार लाल किल्ल्यावर सन्मान


चीनी व्हायरसच्या उद्रेकाविरुध्द लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी अनोखा सन्मान करणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लालकिल्यावर होणाऱ्या समारंभात या योद्ध्यांना खास निमंत्रित केले जाणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील चीनी व्हायरसच्या उद्रेकाविरुध्द लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी अनोखा सन्मान करणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लालकिल्यावर होणाऱ्या समारंभात या योद्ध्यांना खास निमंत्रित केले जाणार आहे.

चीनी व्हायरसविरुध्द लढण्यात डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्याारख्या योद्ध्यांनी प्राणाची बाजी लावली. योद्ध्याप्रमाणे ते लढले. त्याचबरोबर व्हायरसची बाधा झाल्यानंतरही त्यांच्याशी यशस्वीपणे मुकाबला करणाऱ्यां अनेकांच्या बहादुरीचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त आगळीवेगळी मानवंदना दिली जाणार आहे.

परंपरेनुसार पंतप्रधान लाल किल्यावर स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करतील. हे भाषण ऐकण्याची संधी चीनी व्हायरसविरुध्द लढणाऱ्या योद्ध्यांना मिळणार आहे. यंदाच्या कार्यक्रमाला चीनी व्हायरसविरुध्द यशस्वीपणे लढा दिलेल्या दीड हजार कोरोना योद्ध्यांना निमंत्रित केले जाणार आहे. यापैकी पाचशे योद्धे हे पोलीस विभागातील असतील. उर्वरीत हजार जण हे विविध राज्यातील असतील.

गेल्या वर्षापर्यंत १५ ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला जवळपास १० हजार नागरिकांची उपस्थिती होती. पण यंदा ही संख्या निम्म्याहूनही अधिक कमी असणार आहे.

लाल किल्ल्यावरील १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासंदर्भात नुकतीच संरक्षण मंत्रालयाची बैठक झाली. यावेळी सामान्य नागरिकांऐवजी चीनी व्हायरसवर मात करणाऱ्या आणि लढणाऱ्या योद्ध्यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यांच्या उपस्थितीने यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जावा, असा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था