‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’; प्रत्येक भारतीयाची आरोग्यक्रांती

  • चार फिचरसह सुरू होणार योजना; वैयक्तिक ते सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या प्रगतीसाठी उपयुक्त

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा केली. वैयक्तिक ते सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या प्रगतीसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं जास्त महत्वाचं असल्याच समोर आलं आहे. या महामारीच्या काळात मोदी आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. कोविडने आपल्याला दाखवून दिलं की, देशाच्या प्रगतीसोबत देशातील नागरिकांच शारीरिक स्वास्थ देखील तेवढंच महत्वाचं आहे. आरोग्याच्या सोईसुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे.

काय आहे ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’? 

या मिशन अंतर्गत प्रत्येक नागरिकाचा खासगी मेडिकल रेकॉर्ड असणार आहे. ज्यामध्ये कोणत्या आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करायची आहे याची माहिती असणार आहे.

National Digital Health Mission will bring a new revolution in India’s health sector: PM Modi

— Press Trust of India (@PTI_News) August 15, 2020

सोबतच मेडिकल संस्था आणि टेस्ट मेडिकल काऊन्सिलला डिजिटल स्वरूप देण्याची योजना आहे.  दूरवर असलेल्या प्रत्येक नागरिकाला देशातील कोणत्याही ठिकाणची आरोग्य चिकित्सक केंद्राची माहिती मिळू शकेल.

४ फिचरसह लाँच होणार ही योजना 

सर्वात अगोदर हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स, डिजीटल डॉक्टर आणि हेल्थ फॅसिलिटी यामध्ये रजिस्टर केल्या जाणार आहे. त्यानंतर ई-फॉर्मेसी आणि टेलीमेडिसिन सेवेला देखील यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. याकरता गाईडलाईन्स बनवली जाणार आहे.

ऍपकरता ‘या’ गाईडलाईन्स 

नागरिकांकडे ऍपमध्ये सहभागी होण्याची इच्छा हवी. सुरक्षेची काळजी घेणं गरजेचे. आवश्यक माहिती आणि साधी प्रक्रिया

योजने अंतर्गत काय दिले जाणार? 

– हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ केअर रेकॉर्ड, डिजी डॉक्टर, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री, टेलिमेडिसिन, ई-फार्मसी

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*