नीट-जेईईवर देश-परदेशातील १५० प्राध्यापकांचे पंतप्रधानांना पत्र; परीक्षांना उशीर केला तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

  • काही लोक राजकीय अजेंडा चालवत आहेत
  • बिगर एनडीए शासित ७ राज्यांचा कोरोनामुळे नीट-जेईई पुढे ढकलण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नीट-जेईई परीक्षांविषयी देश-विदेशातील विद्यापीठांच्या १५० शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले की, “जर या परीक्षांना जास्त उशीर झाला तर हा विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ होईल. काही लोक आपल्या राजकीय अजेंड्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत.”

अॅडमिशन आणि क्लासेसवरील शंका लवकरात लवकर दूर करणे गरजेचे या पत्रामध्ये लिहिण्यात आले आहे ‘तरुण आणि विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत, मात्र कोरोना महामारीमुळे त्यांचे करिअर धोक्यात आले आहे. अॅडमिशन आणि क्लासेसविषयी अनेक शंका आहेत, ज्या लवकरात लवकर दूर करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावेळीही लाखो विद्यार्थ्यी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र ते यावर्षी घरात बसून काय करायचे आहे याविषयी विचार करत आहेत.’

तरुणांच्या स्वप्नांमध्ये तडजोड केली जाऊ नये.

सरकारने जेईई-मेन्स आणि एनईईटी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. आता परीक्षांमध्ये दिरंगाई केल्यास विद्यार्थ्यांची मौल्यवान वर्षे वाया जातील. तरुणांच्या स्वप्नांचा आणि भविष्याबाबत कोणत्याही किंमतीत तडजोड केली जाऊ नये. आम्हाला खात्री आहे की सरकार जेईई आणि एनईईटी परीक्षा सुरक्षेसह घेण्यात यशस्वी होतील आणि २०२० – २१ चे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले जातील.

मोदींना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये या १० प्रमुख विद्यापीठांचे शिक्षक सहभागी आहेत. दिल्ली विद्यापीठ, इग्नू , लखनौ विद्यापीठ, जेएनयू, बीएचयू , आयआयटी, दिल्ली, यूनिव्हर्सिटी ऑफ लंडन, यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया, हिब्रू यूनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम, बेन गुरियन यूनिव्हर्सिटी, इजरायल कोरोना दरम्यान जेईई-मेन्स आणि एनईईटीची परीक्षा आता विरोधीपक्षाचा मुद्दा बनला आहे.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सर्व राज्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जावे. यानंतर निर्णय घेण्यात आला की, सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली जाईल. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी न्यायालयात जाण्यापूर्वी राष्ट्रपतींना भेटण्याचे सांगितले.

 जेईई-मेन परीक्षा ७ – ११ एप्रिल आणि नीट ३ मे रोजी होणार होती. मात्र कोरोनामुळे ही परीक्षा दोन वेळा टाळण्यात आली. आता सप्टेंबर महिन्याचे शेड्यूल आहे. या परीक्षांना अजून टाळण्याचा अर्ज सुप्रीम कोर्टाने पहिलेज रद्द केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए)ने मंगळवारी म्हटले होते की, परीक्षा आता वेळेवर म्हणजेच जेईई 1 सप्टेंबरपासून ६ सप्टेंबरपर्यंत आणि नीट १३ सप्टेंबरला केली जाईल. दूसरीकडे या परीक्षांचा विरोध करणाऱ्या राज्यांची मागणी आहे की, कोरोना परिस्थिती पाहता सध्या परीक्षा घेणे गरजेचे नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*