नरेंद्र मोदी ७२%; राहुल गांधी १४%


भारत-चीन हिंसक संघर्षानंतर केंद्र सरकारवर लोकांचा विश्वास कायम; एबीपी न्यूज-सी वोटरचा सर्व्हे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत-चीन हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात चीनविरोधी वातावरण तयार झाले असताना जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रचंड विश्वास दाखविला आहे. चीनला यावेळी सडेतोड उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी सर्वच स्तरातून होते दिसत आहे. विरोधी पक्षापासून ते सामान्य जनता यावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे, असे म्हणत आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. राहुल गांधी हे मोदींच्या खूपच पिछाडीवर आहेत.

सद्यस्थितीत जनता केंद्र सरकारसोबत आहे की लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाला आहे, याबाबत एबीपी न्यूज आणि सी वोटरने एकत्रित हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत १०,५०० लोकांशी संवाद साधण्यात आला. या सर्वांना काही प्रश्न विचारून मते जाणून घेण्यात आली.

प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किती विश्वास ठेवता?

खूप जास्त : ७२.६ %
काही प्रमाणात : १६.२%
अजिबात नाही : ११.२%

प्रश्न : भारतासाठी चीन मोठी समस्या आहे की पाकिस्तान?

चीन : ६८% , पाकिस्तान : ३२%

प्रश्न – चीनला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने योग्य पावले उचललीत का?

सरकारने योग्य पावले उचलली : ३९.८%
चीनला सरकारने सडेतोड उत्तर नाही दिले : – ६०.२%

प्रश्न – सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात सरकारवर जास्त विश्वास आहे की काँग्रेसवर?

सरकारवर जास्त विश्वास आहे : ७४%
विरोधी पक्षावर जास्त विश्वास आहे : १७%
कोणावरही विश्वास नाही : ९%

प्रश्न – चीनच्या विरोधात देशातील लोक चीनी वस्तूंवर बहिष्कार घालतील का?

होय : ६८%, नाही : ३२%

प्रश्न – राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्यावर किती विश्वास आहे?

खूप जास्त : १४%
काही प्रमाणात : २५%
काहीच विश्वास नाही : ६१%

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था