नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; देणगी म्हणून बिटक्वाईन देण्याचे केले आवाहन

  • हॅकर ग्रुपचे नाव जॉन विक; नंतर देणगीचे ट्विट केले डिलीट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत. पण, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे (संकेतस्थळ) ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले ट्विटर अकाऊंट हॅक केले आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरने बिटक्वाइन देण्याची मागणी केली. हॅकरने हे ट्विट नंतर लगेच डिलीटही केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटरवर अकाऊंट आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचे ट्विटरवर narendramodi_in नावाने अकाऊंट आहे. हे अकाऊंटच हॅक करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅकरनं हॅक केले. त्यानंतर क्रिप्टो करन्सीसंदर्भातील ट्विट केले. एक ट्विट करण्यात आलं की, मी सगळ्यांना आवाहन करतो की, कोविड-१९ साठी बनवण्यात आलेल्या पीएम रिलीफ फंडाला मदत करा. कोविड-१९साठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर फंडाला उदारपणे देणगी द्यावी, असे आवाहन मी करतो. आता भारतात क्रिप्टो चलनाला करन्सी सुरूवात होतोय. कृपया देणगी म्हणून बिटक्वाईन दान करावे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विट,” असे पहिले ट्विट करण्यात आले.

त्यानंतर दुसरे ट्विट करण्यात आले. ज्यात म्हटले होत की, ‘हे अकाऊंट जॉन विकने (hckindia@tutanota.com) हॅक केलं आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक नाही.” हे दोन्ही ट्विट नंतर डिलीट करण्यात आले. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक संकेतस्थळाचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानं चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटरवर अकाऊंट अधिकृत (व्हेरिफाईड) असून २५ लाख लोक फॉलो करतात. ज्यांनी हे अकाऊंट हॅक केले त्या ग्रुपचे नाव जॉन विक आहे. ३० ऑगस्ट रोजी सायबर सुरक्षा फर्म असलेल्या साईबलने असा दावा केला होता की, जॉन विक ग्रुपचा पेटीएम मॉल डाटा चोरीमध्ये हात आहे. पेटीएम मॉल युनिकॉर्न पेटीएम ई-कॉर्मस कंपनी आहे. मात्र, चौकशीनंतर पेटीएमने माहिती चोरी झाल्याची कुठलीही घटना झाली नसल्याचे म्हटले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*