मुस्लिम धर्मांधांच्या षडयंत्रातूनच दिल्लीत दंगल; दडवलेले कटू सत्य उघड

दिल्ली दंगलीमागे असलेल्या षडयंत्राला उघड करणारे ‘दिल्ली रायटस २०२०: द अनफोल्ड स्टोरी’ हे पुस्तक प्रकाशित होत असताना आणखी एक पुस्तक ‘दिल्ली दंगे- साजीश का खुलासा’ याचेही प्रकाशन होत आहे. मुस्लिम धर्मांधांनी षडयंत्र करून पध्दतशिरपणे दंगल भडकाविली असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. २४ तारखेला दंगे सुरू होण्यापूर्वी मुस्लिम पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून घरी नेले होते. त्यामुळे हा कट खूप पूर्वीपासून शिजत होता आणि बहुतांश मुस्लिमांना माहित होता, असेही यात म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीमागे असलेल्या षडयंत्राला उघड करणारे ‘दिल्ली रायटस २०२०: द अनफोल्ड स्टोरी’ हे पुस्तक प्रकाशित होत असतानाच आणखी एक पुस्तक ‘दिल्ली दंगे- साजीश का खुलासा’ याचेही प्रकाशन होत आहे. मुस्लिम धर्मांधांनी षडयंत्र करून पध्दतशिरपणे दंगल भडकाविली असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

२४ तारखेला दंगे सुरू होण्यापूर्वी मुस्लिम पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून घरी नेले होते. त्यामुळे हा कट खूप पूर्वीपासून शिजत होता आणि बहुतांश मुस्लिमांना माहित होता, असेही यामध्ये म्हटले आहे. प्रभात प्रकाशनाकडून हे पुस्तक प्रकाशित होत आहे.

याबाबत प्रभात प्रकाशनाचे संचालक म्हणाले, सत्य बाहेर यावे म्हणूनच या संवेदशील विषयावर आम्ही पुस्क आणत आहोत. काही राजकीय पक्षांकडून धार्मिक कट्टरतावादाला पोसले जात असून त्यांचा पर्दाफाश करणे आवश्यक होते. हे काम या पुस्तकाने केले आहे.

धर्मांध मुस्लिम आणि शहरी नक्षलवाद्यांकडून दिल्ली दंगल घडविण्यात आली असा दावा करून या पुस्तकात म्हटले आहे की, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील मानसिकतेचा वापर करून घेऊन लोकांमध्ये चुकीची माहिती पसरविण्यात आली. द्वेषमूलक वक्तव्ये करण्यात आली. यामध्ये आम आदमी पक्ष आणि चंद्रशेखर यांची भीम आर्मीही सहभागी झाली होती. यासाठी मशीदींमध्ये होणार्या नियमित नमाजांमधून संदेश दिले गेले. इशान्य दिल्लीमध्ये तर लाऊडस्पिकरवरून दिवसातून अनेक वेळा भडकाऊ भाषणे प्रसारित केली जात होती. पुरेशी तयारी झाल्यावर या समाजविघातक घटकांनी मोठ्या प्रमाणावर दगड, पेट्रोल पंप, देशी कट्टे, अ‍ॅसीडची पाकिटे गोळा केली.

भडकावलेल्या दिल्लीतील नागरिकांच्या मदतीला १५ ते ३५ वयोगटातील सुमारे सात हजार बाहेरील लोक आले. भीम आर्मीचे कार्यकर्तेही त्यामध्ये सामील झाले. सामाजिक कार्यकर्ता उमर खालिद याने इशारा दिल्याप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या दौर्याची वेळ दंगलीसाठी निवडण्यात आली. हिंदू नागरिकांना याची काहीच माहिती नव्हती, परंतु मुस्लीम मात्र पूर्ण तयारीत होते. त्यामुळे दंग्याच्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी रोजी मुस्लिमांनी आपल्या मुलांना शाळेतून लवकर घरी आणले. सोशल मीडियाचा वापर करून खोटी माहिती पसरविण्यात आली. प्रोपोगंडा मशीनरी तयार करण्यात आली. त्यातून दंगल आणखीनच भडकली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*