ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक, शोविक, मिरांडा, दिपेशनंतर एनसीबीची कारवाई

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चौकशीवर अखेर आज पडदा पडला. सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाली आहे. शोविक,मिरांडा,दिपेशनंतर एनसीबीची ही मोठी कारवाई आहे. रियाने ड्रग्ज घेत होती आणि ड्र्ग्ज पुरविणाऱ्यांच्या ती संपर्कात होती,अशी कबुली दिली आहे. तिची वैद्यकीय व कोविड तपासणी सायन रूग्णालयात केली जाणार असून एनसीबीचे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तिच्या टॅबमध्येही ड्रग्जबाबतचे काही महत्वाचे व्हिडीओ मिळाले आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव पुढे आले. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव घेतले गेले. तिचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने एनसीबीने ताब्यात घेतले होते. रियाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे एनसीबीने रियाला अटक केली आहे. या ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या तिन दिवसाच्या चौकशीत सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज चॅटसमोर आल्यानंतर रियाच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या. ईडीच्या चौकशीत रिया आणि शौवितमद्ये झालेले फोनवरील ड्रग्ज चॅटसमोर आले होते. ईडीने हे चॅटसमोर आले होते. ईडीने हे चॅट सीबीआय आणि एनसीबीकडे सोपवले. यानंतर एनसीबीने चौकशी सुरु करत अनेक ड्रग्ज पेडलर्सला अटक केली.

रिया स्वतःच अडकली आपल्या जाळ्यात

काही दिवसांपुर्वी रियाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपला ड्रग्ज डिलमध्ये कोणताच सहभाग नसल्याचे सांगितले होते मात्र रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती,सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंतला अटक झाल्यानंतर त्यांनी थेट रियाचे नाव घेतले. शौविकने रियाच्या सांगम्यावरून ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली. त्यामुळे ती स्वतःच या जाळ्यात ओढली गेली

आपल्याच बोलण्यावरून रियाची पलटी

एनसीबीच्या चौकशीत रियाने मान्य केले की सुशांतसाठी ती ड्रग्ज विकत घ्यायची मात्र आपण कधीच ड़्रग्जचे सेवन केले नसल्याचे रियाचे म्हणणे आहे. धुम्रपान आणि मद्यप्राशन करत असल्याचे रियाने स्विकारले. ड्रग्ज कधीचे घेतले नाही असे तिचं म्हणणे आहे. रविवारी चौकशीच्या आधी तिच्या वकीलांनी असे विधान केले होते की, रिया चक्रवर्ती अटक होण्यास तयार आहेत. तेव्हा असा अंदाज लावणय्त आला होता की रियाला अटक होऊ शकते. मात्र रविवारी चौकशी करून एनसीबीच्या टिमने तिला घरी पाठवले.आज पुन्हा तिला चौकशीसाठी बोलविले आणि त्यानुसार रियाने चौकशीला पूर्ण सहकार्य न केल्यास शौविक चक्रवर्ती यांना ज्या आधारावर अटक केली गेली त्याच आधारावर तिला आज एनसीबीने ताब्यात घेत अटक केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*