डॉक्टरांना कळत नाही असे तुमचेही मत आहे का? मार्डचा उध्दव ठाकरे यांना सवाल

उध्दव ठाकरे यांची भाषाच संजय राऊत बोलतात असे म्हटले जाते. यावरून महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) उध्दव ठाकरे यांना सवाल केला आहे की डॉक्टरांना काही कळत नाही असे तुमचेही मत आहे का? मार्डच्या या सवालावर उध्दव ठाकरे यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उध्दव ठाकरे यांची भाषाच संजय राऊत बोलतात असे म्हटले जाते. यावरून महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) उध्दव ठाकरे यांना सवाल केला आहे की डॉक्टरांना काही कळत नाही असे तुमचेही मत आहे का? मार्डच्या या सवालावर उध्दव ठाकरे यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही.

शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळं डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेनं (मार्ड) या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

‘जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले तरी त्यांना काही कळत नाही. माझ्या मते डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरकडून औषध घेत नाही, कम्पाऊंडरकडून घेतो,’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केलं होतं.

राऊत यांच्या या आक्षेपार्ह शेऱ्यामुळे मार्डने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. एकीकडे डॉक्टरांना कोरोना योद्धे म्हणायचं आणि दुसरीकडं आपल्याच सहकाऱ्यांनी अशी वक्तव्यं करायची याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? अनेक दिवसांपासून घरी न जाता, आईवडिलांचे तोंडही न पाहता जिवाची बाजी लावून अनेक डॉक्टर काम करत आहेत.

डॉक्टरांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं ते हे ऐकण्यासाठीच का? डॉक्टरांना काही कळत नसेल तर सरकारने डॉक्टरांचे कृती दल कशासाठी तयार केले. राऊत यांनी केलेलं वक्तव्य तरुण डॉक्टरांचं खच्चीकरण करणारं आहे. आपली सुद्धा अशीच अधिकृत भूमिका आहे का, असा प्रश्न करून मार्डने इशारा देताना म्हटले आहे की, संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा, त्यांनी मांडलेली भूमिका हीच आपली अधिकृत भूमिका आहे हे गृहित धरून डॉक्टर रस्त्यावर उतरतील.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*