ठाकरे – पवार सरकारच्या उद्योग मंत्र्यांवर कोणाचा आला दबाव?


  • चिनी कंपन्यांशी स्थगित केलेल्या करारांबाबत १२ तासांच्या आत घुमजाव
  • करार रद्द करण्यात आलेले नाहीत; ठाकरे – पवार सरकारची दुपारची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “तीन चिनी कंपन्यांशी महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारने केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत,” अशी ताजी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दुपारी दिली.

भारत – चीन हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनशी सर्व प्रकारच्या संबंधांबाबत समीक्षा सुरू झाली. केंद्राने अनेक कंत्राटे रद्द केली. त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने ५००० कोटींचे करार स्थगित केल्याची बातमी उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या हवाल्याने सकाळी आली. “ठाकरे सरकारचा चीनला दणका”, अशा बातम्या मीडियात झळकल्या. सोशल मीडियावर चढवल्या. पण अचानक दुपारी सुभाष देसाईंना खुलासा करावा लागला.

“चिनी कंपन्याशी केलेले हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे,” असे देसाई यांनी दुपारी स्पष्ट केले. आहे. हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांशी महाराष्ट्र सरकारने १५ जून रोजी सामंजस्य करार केले आहेत.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, एक हजार कोटी आणि 3 हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा २ मध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहातो आहोत, असे देसाई यांनी सांगितले.

पण सकाळी आलेल्या बातमीतही केंद्र सरकारच्या संमतीचा मुद्दा त्यांनी सांगितला होता. पण नेमके काय झाले? कोणत्या अडचणी तयार झाल्या? सकाळी आलेल्या बातमीतील तपशीलात बदल करून वेगळा खुलासा करण्याची वेळ का आली?, कोणाचा आणि कशा प्रकारचा दबाव आला? याची चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था