चीनविरोधात तमाम भारतीयांचा मोदींवर जबरदस्त विश्वास; भारत चीनला हरवेल ७२%, चीनी अँपवर बंदी ९१%, अर्थव्यवस्था सुधारेल ५०%


  • मोदी सरकारकडून अजूनही अच्छे दिनची अपेक्षा; आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष
  • युपीए काळातील अर्थव्यवस्थेपेक्षा स्थिती चांगली असल्याचे ५०% हून अधिक लोकांचे मत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या संरक्षण आणि आर्थिक धोरणांवर जनतेचा विश्वास कायम आहे. तब्बल ९१% लोकांना चीनी अँपवरील बहिष्कार योग्य वाटतो. भारत चीनचा पराभव करेल असे ७२% लोकांना वाटते. भारतीय सैन्यावर भारतीयांचा विश्वास आहे. ६७% लोक चीन विरोधात मेड इन इंडिया वस्तूंवर जादा खर्च करण्यास तयार आहेत. भारताने चीनला सडेतोड उत्तर दिल्याचे मत ६९% लोकांनी व्यक्त केले.

मात्र अनेकांनी अर्थव्यवस्था धीम्या गतीने सुरू असल्याचे म्हटले आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि कार्वी इनसाइट्सने मूड ऑफ द नेशन २०२०’ सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी अर्ध्याहून जास्त जणांनी युपीए सरकारच्या काळातील अर्थव्यवस्थेशी तुलना करता मोदी सरकारमधील अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याचे मत नोंदवले आहे. पण ऑगस्ट २०१९ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत हा आकडा ६० टक्क्यांवरून खाली घसरला आहे.

सर्वेक्षणात १९ राज्यातील १२ हजार १४१ लोक सहभागी झाले होते. यामधील ३०% लोकांनी युपीए सरकारच्या कार्यकाळाशी तुलना करता अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या वाईट असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारसाठी चिंतेची बाब म्हणजे युपीए सरकारला गेल्या नऊ सर्वेक्षणामध्ये मिळालेला हा सर्वोत्तम प्रतिसाद आहे.

लोकांना अद्यापही मोदी सरकारकडून अच्छे दिनची अपेक्षा असल्याचे सर्वेक्षणामधून ठळकपणे जाणवत आहे. सर्वेक्षणात सहभागी फक्त २९% लोकांनी अर्थव्यवस्था अत्यंत योग्य स्थितीत असल्याचे सांगितलं आहे. तर ६०%लोकांनी अर्थव्यवस्था ढासळत असल्याचे नमूद केले आहे. २८% लोकांनी अर्थव्यवस्था स्थिर असून ना सुधारत आहे, ना ढासळत आहे असे मत नोंदवले आहे. सर्वेक्षणात सहभागी अर्ध्याहून कमी जणांनी पाच वर्षांत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे सर्वेक्षण १५ जुलै ते २७ जुलै २०२० दरम्यान करण्यात आलं आहे. यामध्ये १९ राज्यांमधील १९४ विधानसभा मतदारसंघ आणि ९७ लोकसभा मतदारसंघातील १२ हजार १४१ जणांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोक सहभागी होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था