गांधी घराण्याचा तामिळनाडू काँग्रेसच्या प्रॉपर्टीचा २० हजार कोटींचा घोटाळा; ट्रस्टींकडून सह्या घेऊन 7 star hotel बांधणीचा डाव


  • संघ विचारक एस. गुरूमूर्तींची एकापाठोपाठ एक ट्विटस्
  • नँशनल हेरल्ड घोटाळ्यापेक्षा दसपट मोठा घोटाळा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नँशनल हेरल्डच्या २००० कोटींच्या घोटाळ्यात जामीनावर बाहेर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधींचा आणखी घोटाळा डोकं बाहेर काढू लागलाय. तामिळनाडू काँग्रेसच्या तब्बल २० हजार कोटी रूपयांच्या प्रॉपर्टीचा हा घोटाळा आहे.

संघ विचारक एस. गुरूमूर्ती यांनी एका पाठोपाठ एक ट्विटस् करून या घोटाळ्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ट्विटस् मध्ये काँग्रेसच्या ज्या माजी नेत्यांची आणि माजी ट्रस्टींची नावे घेतली आहेत, ते बोलायला लागले की एका मागून एक धक्कादायक खुलासे बाहेर येतील, असेही गुरूमूर्ती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

गुरूमूर्तींच्या ट्विटला ज्येष्ठ पत्रकार राजगोपालन यांनी उत्तर दिले आहे. यात ते म्हणतात, की तमिळनाडू काँग्रेसच्या टेनमपेट प्रॉपर्टीवर एका मुंबईच्या बिल्डरकडून 7 star hotel बांधून घ्यायचे घाटत आहे. तुम्ही काँग्रेसच्या ट्रस्टमधील माजी खासदार सुदर्शन नचीअप्पन, सी. आर. केशवन आणि के. सी. चक्रवर्ती यांना विचारा. ते ट्रस्टी आहेत. केशवन यांना भरपूर माहिती आहे. कोणी PIL दाखल केली तर प्रचंड मोठा घोटाळा बाहेर येईल. केशवन हे काँग्रेसचे बडे नेते आणि माजी गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे नातू आहेत.

या बाबत गुरूमूर्ती यांनी ट्विट करून आणखी माहिती उघड केली आहे. २००९ मध्ये यूपीए २ सरकार केंद्रात असताना एक दिवस सर्व ट्रस्टींना दिल्लीत बोलावण्यात आले. राहुल गांधींची भेट घेण्याचे सांगण्यात आले. राहुल गांधींनी ट्रस्टींना काही कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगितले. ट्रस्टींनी सह्या केल्या. एक ट्रस्टी त्यावेळी तेथे नव्हते. ते परदेशात होते. त्यांनी राहुल गांधींना पत्र लिहून काही मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, राहुल गांधींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

या सर्व प्रकारात सोनिया गांधींनी राहुल यांना साथ दिली. आपले हेतू साध्य करवून घेण्यासाठी सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने नवे ट्रस्टी नेमले. राहुल गांधींचे उजवे हात कनिष्क सिंह यांनी ट्रस्टचे अधिकार आणि अकाउंट्स ताब्यात घेतली. ट्रस्टची मालमत्ता २० हजार कोटी रूपयांची आणि वार्षिक उत्पन्नही कोट्यवधी रूपयांचे अाहे. हे सगळे होताना बाकीचे ट्रस्टी जी. के. वासन, चक्रवर्ती आणि जयंती नटराजन काय करताहेत?, असा बोचरा सवाल गुरूमूर्ती यांनी केला आहे.

गुरूमूर्ती यांनी असेही ट्विट केले आहे की, वासन त्यांच्याशी बोलले. सहा वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर काय झाले हे त्यांना म्हणजे वासन यांना काहीही माहिती नाही. हा ट्रस्ट १९५० च्या दशकात कामराज काँग्रेस अध्यक्ष असताना स्थापन झाला. रामनाथ गोएंका हे सुरवातीचे ट्रस्टी असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था