गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉइंट 14 पर्यंत भारतीय सैन्य गस्त घालणार


  • चीनची माघारी पूर्ण होणे अपेक्षित; मात्र, फिंगर 8 पॉइंटच्याही मागे चीनी सैन्याला हटविण्यावर भारत ठाम
  • – चीनी सैन्य फक्त दीड किलोमीटरपर्यंत मागे हटलेय; चीनी सैनिकी वाहनांचा वावर आवरता घेण्यावरही भारत आग्रही

वृत्तसंस्था

लेह : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनी सैन्याने माघार घेतल्यानंतर भारतीय सैन्य दले पेट्रोलिंग पॉइंट 14 पर्यंत गस्त घालणार आहे. याच पॉइंटवर रक्तरंजित संघर्ष झाला होता. चीनी सैन्याने माघारीस सुरवात करून तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी तिला वेग येणे अपेक्षित आहे. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. तरीही भारतीय सैन्य दल सावध पवित्र्यात आहे. फिंगर 8 पॉइंटच्याही मागे चीनी सैन्य मागे हटविण्यावर भारत ठाम आहे. भारतीय सेनादल सूत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

एकदा चीनी सैन्य पूर्णपणे माघारी गेले की भारतीय सैन्याचा मार्ग निर्वेध होईल. ते पीपी 14 पर्यंत नियमित गस्त वाढवू शकेल, असे सैनादलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. भारत – चीन या दोन्ही बाजूंनी commitment पाळली पाहिजे. मात्र जूना अनुभव लक्षात घेता भारतीय सैन्य अधिक सावध आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

अर्थात चीनी सैन्य एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत माघारी फिरले असले तरी चीनी सैनिकी वाहनांचा वावर अजूनही या भागामध्ये आहे. तो कमी करण्यावर भारतीय बाजूने भर दिला आहे. सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे अत्यंत सावधानतेने आणि बारकाईने लक्ष ठेवून आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत दोन्ही सैन्यांच्या positions जी स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे. परंतु, यापूर्वी कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत जे ठरले होते, तो शब्द चीनने फिरवला होता. त्यामुळे १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ रक्तरंजित संघर्ष झाला होता.

चीनने गलवानमध्येच नव्हे तर हॉटस्प्रिंग, पँगाँग टीएसओ भागातही घुसखोरी केली आहे. इथे फिंगर 4 पर्यंत चीनी सैन्य आत आले आहे आणि हा संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर 8 पर्यंत गस्त घालायचे. त्यामुळे चीनी सैन्याने फिंगर आठपर्यंत माघारी फिरावे ही भारताची मुख्य मागणी आहे. या मागणीवर चीनचा प्रतिसाद कसा येतो, यावर भारताची पुढची सैनिकी, राजनैतिक चाल ठरणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था