खरीपाच्या पेरणीत १००% वाढ; ३१६ लाख हेक्टरवर पेरणी

  • भारतीय शेतकऱ्याची विक्रमी कामगिरी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : खरीप हंगामाच्या पेरण्यांमध्ये यंदा १००% वाढ होऊन ती ३१६ लाख हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतीची कामे थांबली नव्हती त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

तांदूळ, कडधान्ये, ज्वारी, कापूस, धान यांच्या पेरण्या गेल्या खरीप हंगामाच्या दुप्पट झाल्या आहेत. भारतीय शेतकऱ्याने ही क्रांती घडवून आणली आहे. दक्षिण – पश्चिम मान्सूनने १२ दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला असताना खरीपाच्या पेरण्यांमधील वाढीने भरघोस उत्पादनाची आशा निर्माण केली आहे.

तेलबिया आणि कडधान्ये ८३.३१ लाख हेक्टरवर पेरण्यात आली असून गेल्या हंगामात १३.३२ लाख हेक्टरवर त्यांचा पेरा होता. कापसाची पेरणी २७ लाख हेक्टरवरून ७१.६९ लाख हेक्टर एवढी वाढीव करण्यात आली आहे. भुईमुगाचे क्षेत्रही वाढले असून ते १८.४५ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती जारी केली आहे.

तांदळाची लागवड २७.९३ लाख हेक्टवरून ३७.७१ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. सोयाबिनच्या पेरणीतही २.६६ लाख हेक्टरवरून पेरणी ६३.२६ लाख हेक्टरवर पोहोचली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*