कोविड सेंटरपासून सगळीकडे महिला अत्याचारात वाढ; हेच का ठाकरे – पवार सरकारचे महिला धोरण?; चित्रा वाघ यांचा तिखट सवाल

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्यातील कोविड केअर सेंटर, क्वॉरंटाइन सेंटरमध्ये महीलांबाबत जे गैरप्रकार होत आहेत त्याप्रश्नी सरकार अजूनही गंभीर नाही. कोविड सेंटरमध्ये महीलांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा होत नसल्याने राज्य शासनाच्या अजेंडयावर महीला सुरक्षेचा मुददा आहे की नाही ? असा सवाल करत राज्य सरकार महीला सुरक्षेबाबत अपयशी ठरल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. महीला सुरक्षेसाठी दिशा कायदा लागू करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

राज्यात विविध जिल्हयांमध्ये कोविड सेंटर तसेच क्वॉरंटाईन सेंटरमध्ये महीलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या याबाबत भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महीला सुरक्षेचा मुददा उपस्थित केला आहे. या पार्श्वभुमीवर त्यांनी राज्यातील विविध जिल्हयांमध्ये जाउन कोविड सेंटरमधे महीला रूग्णांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत पाहणी केली.

शुक्रवारी नाशिकमध्ये मेरी, नाशिकरोड आणि समाजकल्याण विभाग कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना त्या म्हणाल्या की, राज्यातील चंद्रपुर, कोल्हापुर, पुणे, मुंबई येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त महीला रूग्णांवर अत्याचाराच्या घटना घडल्या.

कठिकाणी महीलांवर अत्याचार झाले आहेत, ते अल्पवयीन मुलींपर्यंत पोहोचले असून राज्य शासन नेमकं महीलांसाठी करत तरी काय ? केवळ कोविड सेंटरपुरता महीला सुरक्षा हा प्रश्न नसून गेल्या चार महीन्यांचा आढावा घेतला असता महीलांवर अत्याचार घडत असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा हा महाराष्ट्र आहे का ? गृहमंत्री, मुख्यमंत्री यासारख्या गंभीर विषयावर गप्प का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

पनवेल येथील विलगीकरण कक्षात ४० वर्षीय महीलेवर अत्याचाराची घटना घडली, अमरावतीमध्ये कोरोना टेस्टिंगच्या नावाखाली एका तरूणीच्या गुप्तांगातून स्वॅब नमुने घेण्यात आल्याने उपचारासाठी येणार्‍या महीलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे कोरोनाग्रस्त महीलेने उपचारासाठी जायचे नाही का ? की महीलांनी घरातल्या घरातच मरायचे असा सवाल उपस्थित करत राज्यात महीलांच्या सुरक्षेसाठी दिशा कायदा लागू करावा अशी मागणीही वाघ यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*