काँग्रेसमधले “विवेकाचा आवाज” असलेले तरूण नेते सचिन पायलटांच्या पाठीशी


  • ज्योतिरादित्य, प्रिया दत्त, जितीन प्रसाद, शशी थरूर यांचा जोरदार पाठिंबा
  • महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? : प्रिया दत्त
  • काँग्रेसमध्ये गुणवत्तेला स्थान नाही : ज्योतिरादित्य शिंदे
  • सचिन पायलट यांनी काँग्रेससाठी खूप कष्ट घेतले. ते माझे कायमच मित्र : जितीन प्रसाद
  • सचिन गुणवान आणि पक्षासाठी कष्ट घेणारे नेते : शशी थरूर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनही त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. काँग्रेसमध्ये फक्त नेहरू – गांधी घराण्यावरील निष्ठा नव्हे तर, ज्यांचा “विवेक बुद्धीचा” आवाज मानला जातो, असे हे तरूण नेते आहेत.

माजी खासदार प्रिया दत्त यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. प्रिया दत्त यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये प्रिया दत्त यांनी म्हटले आहे की, माझ्या आणखी एका मित्राने पक्ष सोडला. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोन्ही प्रचंड गुणवत्ता असलेले तरुण उमदे नेते होते.

आमच्या पक्षाने हे दोन्ही नेते गमावले आहेत. महत्त्वाकांक्षी असण्यात काहीही गैर नाही, असे मला वाटते. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे या दोघांनीही कठीण काळात पक्षासाठी मेहनत घेतली. प्रिया दत्त यांच्या या एकूण ट्विटचा सूर हा ज्येष्ठांविषयी नाराजी व्यक्त करणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये तरुण विरुद्ध ज्येष्ठ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील ट्विट करून काँग्रेसमध्ये गुणवत्तेला स्थान उरले नसल्याचे म्हटले आहे. सचिन यांनी पक्षाबाहेर आपले राजकीय भवितव्य शोधण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

काँग्रेसचे नेते जितेंद्र प्रसाद यांचे चिरंजीव जितीन प्रसाद यांनी देखील सचिन पायलट यांची पाठराखण केली आहे. सचिन यांनी काँग्रेसमध्ये कष्ट केले. ते माझे चांगले मित्र आहेत, असे ट्विट त्यांनी केले.

सचिन यांचे वडील राजेश पायलट आणि जितीन यांचे वडील जितेंद्र प्रसाद यांनी काँग्रेसमध्ये कायम बंडखोरीची भूमिका घेतली. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.

अभिनेते सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त यांनी २०१९ साली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीपासून मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी माजली आहे. पक्ष संघटनेत परस्परविरोधी गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रिया दत्त लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणापासून दूरच राहिल्या आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती