करिश्मा भोसले मशिदीवरील भोंग्यांविरोधात बोलली; अबू आझमीने धमकी दिली; ठाकरे – पवार सरकारने तिलाच नोटीस पाठवली

  •  मनसे करिश्माच्या मदतीला धावली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मानखुर्दची करिश्मा भोसले मशिदीवरील भोंग्यावरून अजा़न देण्याविरोधात बोलली. तिच्या विरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला. आमदार अबू आझमीने तिलाच घर आणि परिसर सोडून जाण्याची धमकी दिली. वर महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारच्या पोलिसांनी तिच्या आईच्या नावाने वर्षा भोसले यांनाच नोटीस पाठवली. राज ठाकरे मनसे मात्र या धाडसी तरूणीच्या पाठिशी उभी राहिली आहे.

मानखुर्दमध्ये २४ जूनपासून हा मुद्दा तापतोय. करिश्माने या सर्व वादाचे विडिओ शेअर केले आहेत. तिने मशिदीत जाऊन भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली त्यावर तेथील जमावाने तिलाच धमकावले. तिने अजा़न विरोध नाही तर भोंग्यांवरून आजा़नला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही तिच्या विरोधात मुस्लीम समाज एकवटला. मशिदीत जाऊन भोंग्यांचा आवाज कमी करायला सांगणे अनुचित होते. तिच्या विरोधात कलम १८८ आणि कलम १४९ नुसार कारवाई केली जाईल, अशी नोटीस पोलिसांनी पाठवली आहे.

त्याआधी “मजहब नही सिखाता आपस में बैर रखना मग कशाला हवे आहेत भोंगे जनसंख्येचा प्रभाव दाखवाया?” असा ट्रेंड सोशल मीडियावर चालला. “गणेशमूर्तीची उंची महत्त्वाची नसून त्यामागे असलेली आपली श्रद्धा महत्वाची आणि मशिदींवरील भोंग्यांचा आवाज महत्त्वाचा नसून भावना महत्त्वाची.” या ट्रेंडलाही चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर करिश्माला पाठिंबा देण्याची मोहीम सुरू झाली.

 

करिश्मा भोसले या भगिनीने मशिदीवरील भोंग्यीविरुद्ध आवाज उठाविला. “शांतताप्रिय जमात” तिला त्रास देत आहे. असे सांगत
तिच्या समर्थानासाठी ट्विटर ट्रेडिंग हैशतैग iSupportkarishmabhosle, StopAzanOnLoudspeakers यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. यानंतर या मुद्दयावर मनसे करिश्माच्या पाठिशी उभी राहिली आहे.

अबू आझमीने करिश्मा आणि तिच्या कुटुंबीयांना धमकी देऊ नये. तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न झाला तर अबू आझमीला ठोकून काढण्याचा इशारा मनसे कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला आहे. पोलिसांनी हिंदूंना समजवण्यापूर्वी कायदेशीर कारवाई करून मशिदीवरचे भोंगे काढावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*