एकनाथ शिंदे यांचे पंख कापण्यासाठी रवींद्र वायकर शिवसेना समन्वयकपदी

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. राज्यातील सत्तासंघर्षात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. एक वेळ अशी होती की शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचे नाव येऊ शकते, याची चर्चा होते. मात्र, शिंदे यांच्या महत्वाकांक्षांना पंख फुटून ते डोईजड होऊ नयेत यासाठी आता रवींद्र वायकर यांची शिवसेना समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. राज्यातील सत्तासंघर्षात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. एक वेळ अशी होती की शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचे नाव येऊ शकते, याची चर्चा होते. मात्र, शिंदे यांच्या महत्वाकांक्षांना पंख फुटून ते डोईजड होऊ नयेत यासाठी आता रवींद्र वायकर यांची शिवसेनर समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात सत्तासंघर्षात केवळ शिवसेनेतीलच नव्हे तर राष्ट्रवादीचे आमदारही फुटू नयेत यासाठी शिंदे यांनी प्रयत्न केले होते. अगदी राष्ट्रवादीच्या आमदारांचे हॉटेलमध्ये रक्षणही केले होते. शिवसेनेच्या राज्यभरातल्या आमदारांशी संपर्क एकनाथ शिंदे ठेवतात. मात्र, त्यामुळेच शिंदे आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतील, अशी भीती उध्दव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना वाटत आहे.

आता शिवसेना आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर आमदारांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे. या मागण्याचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामे लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश असल्याचा सांगितले जात आहे. मात्र यामध्ये शिंदे यांचा शिवसेना आमदारांशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न आहे. या निमित्ताने शिंदे यांना उध्दव ठाकरे यांनी संदेश दिल्याचेही मानले जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*