इस्लामसंबंधी पोस्ट : कॉंग्रेस मुस्लिम आमदाराचा काँग्रेसच्याच दलित आमदाराच्या घरावर हल्ला; २ ठार, ६० पोलीस जखमी

  • बेंगळुरूमधील हिंसक घटना, गाड्या जाळल्या, ११० लोकांना अटक; वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यालाही अटक
  • बेंगळुरूत १४४ कलम लागू; जमावबंदीचे आदेश

वृत्तसंस्था

बेंगळुरू : फेसबुकवरील इस्लामसंबंधी वादग्रस्त पोस्टवरून संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी रात्री पुलकेशी नगरचे काँग्रेसचे दलित आमदार आर. अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. इस्लामसंबंधी वादग्रस्त पोस्ट आमदार मूर्ती यांच्या बहिणीच्या मुलाने केली होती. त्याला पोलिसांनी अटक केली. कॉँग्रेसचेच आमदार जमीर अहमद खान यांनी जमावचे नेतृत्व  पण पोलिसात तक्रार देखील केली

वादग्रस्त पोस्ट विरोधात चामराज पेटचे कॉँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांनी स्थानिक धार्मिक नेत्यांसह डी. जे. हळ्ळी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. जमावाने पोलिस ठाण्यालाही घेराव घातला होता.

बंगळुरुमध्ये कावळ बायसंद्रा येथे ही घटना घडली. संतप्त जमावाने थेट आमदार मूर्तींच्या घरात घुसून तोडफोड केली. गाड्या पेटवून दिल्या. मोठया प्रमाणावर हिंसाचार केला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात ६० पोलीसही जखमी झाले आहेत.

आमदार मूर्ती यांच्या बहिणीच्या मुलाने ही वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. त्यावरून हा सर्व वाद निर्माण झाला. शहरातील डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या हिंसाचार झाला. पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. या हिंसाचारामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह ६० पोलीस जखमी झाले आहेत. बंगळुरुमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कमल पंत यांनी दिली. “इस्लामसंबंधी वादग्रस्त पोस्ट माझ्या बहिणीच्या मुलाने व्हायरल केली. माझा तिच्याशी काही संबंध नाही,” असे आमदार मूर्ती यांनी सांगितले.

या हिंसाचाराशी संबंधित ११० लोकांना अटक करण्यात आली असून अजून काही लोकांना अटक करण्यात येईल, अशी माहिती बंगळुरु गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली. वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पूर्व बंगळुरुत राहणाऱ्या या काँग्रेस आमदार मूर्ती यांच्या घरावर शेकडो लोकांनी दगडफेक केली. आमदाराच्या निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी पोहोचू नये, यासाठी जमाव गाडीचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करत होता. ही घटना घडली त्यावेळी आमदार मूर्ती घरामध्ये नव्हते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*